शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

थेट सरपंच निवडीने ग्रामपंचायत निवडणुकीत चुरस, तालुक्यातील ११ गावांचा समावेश

By ब्रह्मानंद जाधव | Updated: October 13, 2023 16:52 IST

स्थानिक राजकारणाचा कणा समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुका या महत्त्वपूर्ण आहेत. ग्रामीण भागातील राजकारणावर पकड मजबूत करण्याचे हे एक प्रभावी माध्यम आहे.

चिखली : नोव्हेंबर ते डिसेंबर या कालावधीत कार्यकाळ पूर्ण होणाऱ्या तसेच २०२२ मध्ये प्रभागरचनेत झालेल्या गोंधळामुळे निवडणूक लांबलेल्या तालुक्यातील एकूण ११ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. यामध्ये नऊ ग्रामपंचायतींवर सरपंचाची निवड थेट जनतेतून होणार असल्याने चुरस वाढली आहे.

स्थानिक राजकारणाचा कणा समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुका या महत्त्वपूर्ण आहेत. ग्रामीण भागातील राजकारणावर पकड मजबूत करण्याचे हे एक प्रभावी माध्यम आहे. त्यामुळे सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी या निवडणुकीत रस घेतला आहे. निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होताच सरपंच आणि सदस्यपदासाठी कोणते उमेदवार सरस ठरू शकतात, याची चाचपणी सध्या सुरू आहे. दरम्यान, ग्रामपंचायतची निवडणूक ही कुठल्याही राजकीय पक्षाच्या चिन्हावर लढविली जात नसली तरी स्थानिक स्तरावर पॅनल तयार करून या निवडणुका राजकीय पक्षांच्या नेतृत्वात लढविल्या जातात. त्यातच सरपंचाची निवड ही थेट जनतेतून करण्यात येणार आहे. त्यामुळे या निवडणुकीला अधिक महत्त्व आले आहे. निवडणुका जाहीर झाल्यानंतर ग्रामीण भागातील राजकारण तापले असून गावातील चावडीवर आता निवडणुकीच्या चर्चा सुरू झाल्याचे चित्र आहे. दरम्यान निवडणूक प्रक्रियेचे काम तहसीलदार सुरेश कव्हळे यांच्या मार्गदर्शनात निवडणूक निर्णय अधिकारी व्ही. आर. वैराळ, शिवशंकर चेके, एन. जे. उगले पाहत आहेत.

निवडणुकीचे गावे व सरपंचपदाचे आरक्षणतालुक्यातील ९ गावांच्या सरपंचपदासाठी अंबाशी, करणखेड, मेरा खु., वरखेड, शेलगाव जहाँगीर या पाच गावांमध्ये सर्वसाधारण, असोला बु. अनु.जाती महिला, खंडाळा मकरध्वज सर्वसाधारण महिला, डोंगर शेवली नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि धानोरी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला असे आरक्षण आहे. प्रभाग रचनेतील गोंधळामुळे नायगाव बु., उदयनगर (उंद्री), किन्ही नाईक या तीन गावांमध्ये रिक्त सदस्यपदासाठी निवडणूक होणार आहे. एकूण ११ ग्रा. पं. निवडणुकीतून ८० सदस्यपदासांठी ही निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

५ नोव्हेंबरला होणार मतदानया निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी १६ ते २० ऑक्टोबर ही अंतिम तारीख आहे. दाखल उमेदवारी अर्जाची छाननी २३ ऑक्टोबरला, तर दाखल उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख २५ ऑक्टोबरला दुपारी ३ वाजेपर्यंत आहे. त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होईल. त्यानंतर निवडणूक रिंगणात उभे असणाऱ्या उमेदवारासाठी ५ नोव्हेंबरला मतदान आणि ६ नोव्हेंबरला मतमोजणी केली जाणार आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणा