शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

रानभाज्यांचा मानवी आहारात समावेश महत्त्वाचा - देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:41 IST

मेहकर : रानभाज्यांमध्ये अनेक औषधी गुणधर्म असल्याने या रानभाज्या महत्त्वपूर्ण आहेत; मात्र या रानभाज्या सद्यपरिस्थितीत लुप्त होत असून, नवीन ...

मेहकर : रानभाज्यांमध्ये अनेक औषधी गुणधर्म असल्याने या रानभाज्या महत्त्वपूर्ण आहेत; मात्र या रानभाज्या सद्यपरिस्थितीत लुप्त होत असून, नवीन पिढीला त्यांची ओळखसुद्धा नाही. या रानभाज्यांचे मानवी आहारात असणे हे महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन माजी जिल्हा परिषद विरोधी पक्षनेते दिलीप देशमुख यांनी केले. जागतिक आदिवासी दिनानिमित्त तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांच्यावतीने रानभाजी महोत्सवाचे १३ ऑगस्ट रोजी आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. या महोत्सवाचे उद्घाटन अंत्री देशमुख येथील कृषी सखी वर्षा देशमुख, रेखा गवई यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भुजंगराव म्हस्के, तालुका कृषी अधिकारी किशोर काळे, मंडळ कृषी अधिकारी प्रवीण गाडेकर, सुधाकर कंकाळ, उद्धव काळे, विनोद मोरे, कृषी पर्यवेक्षक राजूरकर, रमेश सुरुजुशे, अमोल सुळकर यांच्यासह सर्व कृषी सहायक, कृषिसेवक, कृषी मित्र व शेतकरी उपस्थित होते. मानवी आहारात प्रामुख्याने वनस्पतींचा समावेश असतो. धान्य, कडधान्य यांच्यानंतर मानवी आहारातील प्रमुख घटक म्हणजे भाजी. बाजारात उपलब्ध होणाऱ्या भाज्या उत्पादन करताना मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा व कीटकनाशकांचा वापर होत आहे. त्यामुळे भाजी उत्पादनात वाढ होत आहे; परंतु भाजीची नैसर्गिक चव व प्रतिकारशक्ती कमी होत चालली आहे. पावसाळ्यात विविध गुणधर्म असणाऱ्या अनेक वनस्पती उगवतात. त्यातील अनेक वनस्पती खाण्याजोग्या असतात, तसेच बऱ्याच वनस्पती या मधुमेह, पोटदुखी, खोकला व इतर औषध म्हणून उपयुक्त आहेत. याच रानभाज्यांबाबत शहरातील नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता असते. या रानभाज्यांची ओळख आणि त्यांचे पौष्टिक व वैद्यकीय गुणधर्म जाणून घेण्यासाठी आदिवासी दिनानिमित्त १३ ऑगस्ट रोजी तालुका कृषी अधिकारी कार्यालय येथे रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.

शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद

या मेळाव्यात प्रामुख्याने करटोली, दिंडा, कुंदा, तरोटा, पाथरी, शेवगा, अंबाडी, केना, अळू, बांबू, कुरडू, आघाडा, काटेमाट, चिवळ, घोळभाजी, भुईआवळा, उंबर, कवट, हडसन, तांदूळकुंद्रा इत्यादी भाज्यांची ओळख करून देण्यात आली. त्यानिमित्त तालुक्यातील शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

बाजारामध्ये विक्रीसाठी येणाऱ्या भाज्या उत्पादित करताना रासायनिक औषध व कीटकनाशकांचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याने ते हानिकारक आहे. यामुळे सेंद्रिय पद्धतीने उत्पादित केलेल्या, तसेच आपल्या अवतीभोवती उत्पादित होणाऱ्या रानभाज्यांचा आहारात समावेश करावा.

-वर्षा देशमुख, कृषी सखी, अंत्री देशमुख.