शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यात संततधार पाऊस; अनेक गावांचा संपर्क तुटला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 11:04 IST

पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला असून, काही मार्गावरील वाहतूकही ठप्प झाली होती.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : चार दिवसापासून जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू असून, अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. जिल्ह्यात ६७.६० टक्के पावसाची नोंद झाली आहे. सोमवारी दिवसभर सर्वत्र पाऊस सुरू होता. जिल्ह्यात गेल्या २४ तासात १४.९ मि.मी. पाऊस झाला आहे. या पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला असून, काही मार्गावरील वाहतूकही ठप्प झाली होती.रविवारी रात्रीपासून या पावसाचा जोर वाढला आहे. सोमवारी दिवसभर सर्वत्र पाऊस होता. रविवारी सकाळी आठ वाजेपर्यंत जिल्ह्यात ६५.६५ टक्के पाऊस झाला आहे. त्यानंतर गेल्या २४ तासामध्ये १४.९ मि.मी. पाऊस झाला असून, दोन टक्याने वाढ यामध्ये झाली आहे. सिंदखेड राजा तालुक्यात एकाच दिवशी ३६.९ मि.मी. व लोणार तालुक्यात ३१.६ मि.मी. पाऊस झाला आहे. एकूण पर्जन्यमानाच्या सरासरीच्या तुलनेत ६७.६० टक्के पाऊस जिल्ह्यात झाला आहे. या संततधार पावसामुळे काही भागातील तलाव ओव्हर फ्लो झाले आहेत. जलसाठ्यातही चांगलीच वाढ झाल्याचे दिसून येते. १६ आॅगस्ट ते १७ आॅगस्ट रोजी सकाळी आठ वाजेपर्यंत गेल्या २४ तासामध्ये बुलडाणा तालुक्यात ७.२ मि.मी., चिखली २८.६ मि.मी, देऊळगाव राजा १४.९, सिंदखेड राजा ३६.९, लोणार ३१.६, मेहकर २१.८, खामगाव ६.८, शेगाव ५.०, मलकापूर ६.५, नांदूरा ७.५, मोताळा ६.७, संग्रामपूर १५.३ व जळगाव जा. तालुक्यात ४.४. मि.मी. पाऊस झाला आहे.

पुरातून मुलगा बचावलापिंपळगाव सराई : सैलानी येथील नदीच्या पुरातून बाहेरगावचा १५ वर्षीय मुलगा वाहून गेला होता. परंतु जांभळीवाले बाबा दर्गाजवळ कैलास मिस्तरी, शे.अरबाज शे.अफसर, शे.सोहब शे.अफसर, शे.हारुण शे.सुलतान यांनी त्याला नदीतून बाहेर काढून त्याचे प्राण वाचविले. त्या मुलाला नदीत वाहल्यामुळे डोक्याला मार लागला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले. त्या मुलासोबत त्याची आई होती. सैलानी दर्गा येथे मुलाच्या उपचारासाठी ते आले होते. या परिसरात मुसळधार पाऊस पडल्यामुळे सैलानी येथील तलाव पूर्णत: भरला असून तो फुटण्याच्या मार्गावर आहे.

येळगाव धरण भरलेबुलडाणा तालुक्यातील येळगाव धरणही १०० टक्के भरले आहे. मागील वर्षीही हे धरण लवकरच ओव्हर फ्लो झाले होते. या धरणाचे दरवाजे उघडले आहेत.

दोघांचे प्राण वाचलेबुलडाणा तालुक्यातील पांग्री येथील पुलावरून पाणी वाहत होते. त्यामुळे अनेक नागरिक पुलाच्या पलीकडे अडकून पडले होते. परंतू एका युवकाने या पाण्यातून दुचाकी काढण्याचा प्रयत्न केला असता, पाण्याचा वेग जास्त असल्याने दुचाकी वाहून गेली. सुदैवाने या पुरातून दोघांचे प्राण वाचले. पुरामुळे बुलडाणा-रायपूर रस्ता बंद झाला.

टॅग्स :buldhanaबुलडाणाRainपाऊस