शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

एक किलो मिठाची तब्बल १२ हजार २०० रूपयाला विक्री; भंडाऱ्याचे साहित्य विक्रीची अनोखी परंपरा 

By ब्रह्मानंद जाधव | Updated: September 11, 2022 18:32 IST

बुलढाणा जिल्ह्यात एक किलो मिठाची १२ हजार २०० रूपयाला विक्री झाली आहे. 

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यात एक किलो मिठाची विक्री तब्बल १२ हजार २०० रूपयांना करण्यात आली आहे, तर अर्धा किलो मिठाच्या पिशव्या १ हजार १० रुपयाला विकण्यात आल्या आहेत. मीठ विक्रीचा हा प्रकार ऐकूण कोणालाही आश्चर्य वाटेल. परंतु ही विक्री एखाद्या किराणा दुकानातील नव्हे, तर मेहकर तालुक्यातील नायगाव दत्तापूर मंदिरातील भंडाऱ्याच्या उरलेल्या साहित्याची आहे. भंडाऱ्याचे साहित्य विक्रीसाठी बोली लावण्याची परंपरा नायगाव वासी अनेक वर्षांपासून जपत आहेत.

मेहकर तालुक्यातील नायगाव दत्तापूर येथील हनुमान मंदिरात पूर्वीपासुन आषाढी एकादशीला एक महिना पोथी पारायणाची परंपरा आहे. त्याचठिकाणी गणेशाची स्थापना व विसर्जनावेळी अमृत योग म्हणून सर्व गावकऱ्यांकडून गहू, तांदूळ आणि तूर दाळ वर्गणी जमा करण्यात आली. संपूर्ण गावाचा १० क्विंटलचा भंडारा येथे गोळा होतो. त्यात सर्व गावकरी आनंदाने सहभागी घेत असतात. परंतु मंदिराची योग्य बांधणी व विकास करण्यासाठी सहा नवयुवक मंडळी येथे आतोनात प्रयत्न करत आहे. त्याठिकाणी मंदिराचे पुजारी म्हणून येथील गजानन तुकाराम निकम हे निशुल्क स्वरूपात आपली अखंड सेवा देत आहे. 

१७० वर्षाची परंपरा आजही जोपासत पारायणाची सांगता व गणरायाची मिरवणूक शुक्रवारी पार पडली. टाळांच्या गजरात व मृदंगाच्या निनादात मिरवणूक काढण्यात आली. अगंणात सडे-रांगोळी काढत फुलांचा वर्षाव करत मिरवणुकीचे स्वागत झाले. संपूर्ण दिवस भक्तिमय होऊन १० सप्टेंबर रोजी १० क्विंटलचा भंडारा सर्व गावकऱ्यांच्या सहभागातून पार पडला. ११ सप्टेंबर रोजी उरलेल्या धान्याची सर्व गावकऱ्यांच्या उपस्थितीत हराशी पार पडली. यात मंदिराचे भंडाऱ्यातील उरलेले धान्य बाजार भावापेक्षा दहा पटीने जास्त दरात विकत घेण्यासाठी गावकऱ्यांमध्ये चढा-ओढ पाहायला मिळाली. 

अशी झाली विक्रीमहाप्रसादाच्या उरलेल्या धान्यातून एक किलो मिठाची थैली येथील सुधाकर तोताराम शेळके यांनी १२ हजार २०० रुपयात घेतली. गहु धनंजय र. निकम यांनी ४ हजार ८५० आणि १०० ग्राम पावडर पिशवी १ हजार २५० रुपयाला घेतली. अर्धा किलो प्रत्येकी मिठासाठी शरद ना. निकम यांनी १ हजार १० रुपये, रामदास ते.निकम ७८० रुपये, दिलीप ज.निकम ५०० रुपये, प्रविण ना.निकम ३५० वाढिव रक्कम बऱ्याच भाविकांनी दिली. मंदिराला एक हातभार लावण्याचे काम दरवर्षी येथे गावकरी मोठ्या आनंदाने करत असतात.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाTempleमंदिर