शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाण्यात शिवसेनेच्या शिंदे व ठाकरे गटात तुफान राडा, शाब्दिक चकमक पोहोचली हाणामारीपर्यंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2022 09:40 IST

कार्यक्रमात अचानकपणे शिंदे गटाचे कार्यकर्ते नारेबाजी करत बंदिस्त सभागृहात घुसले. तेथील खुर्च्यांची तोडफोड करत ठाकरे गटाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना धक्काबुक्की करत संजय हाडे, गाडेकर यांना मारहाण केल्याचा आरोप आहे.

बुलढाणा : शिवसेनेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या सत्कार कार्यक्रमात शिंदे गटाच्या समर्थकांनी घुसून तोडफोड करत धक्काबुक्की व मारहाण केल्याची घटना शनिवारी बाजार समितीच्या सभागृहात घडली. शाब्दिक चकमक आता प्रत्यक्षात हाणामारीपर्यंत पोहोचली आहे. एकीकडे दसरा मेळाव्यासंदर्भाने दोन्ही गटांत धुसफूस वाढत असतानाच बुलडाण्यात हा राडा झाला.ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांसह अनेक कार्यकर्त्यांना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली. मात्र, पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली, असा आरोप ठाकरे गटाचे संपर्कप्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकरांनी केला. शनिवारी दुपारी १ वाजता हा प्रकार घडला. पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी घटनास्थळी धाव घेतली.

नेमके काय घडले -कार्यक्रमात अचानकपणे शिंदे गटाचे कार्यकर्ते नारेबाजी करत बंदिस्त सभागृहात घुसले. तेथील खुर्च्यांची तोडफोड करत ठाकरे गटाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना धक्काबुक्की करत संजय हाडे, गाडेकर यांना मारहाण केल्याचा आरोप आहे.

आमचे कार्यकर्ते तेथे भांडणासाठी गेेले नव्हते. अवाजवी बोलून तेथील व्यक्ती जर हातघाईवर आले तर आम्ही काय करणार? कार्यक्रमात जे बोलले त्यांना प्रसाद भेटला.- आमदार संजय गायकवाड

पोलीस फुटेज तपासत असून, ते पाहून कारवाई केली जाईल. अद्याप पोलिसांना तक्रार प्राप्त झाली नाही. ठाकरे गटाचे पदाधिकारी आपणास भेटून गेले. त्यांनाही तक्रार देण्याबाबत सांगितले आहे.- अरविंद चावरिया, पोलीस अधीक्षक

 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरे