शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

‘रामसर’ दर्जामुळे राष्ट्रीय धोरणात लोणार सरोवराला महत्त्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2020 12:08 IST

लोणार सरोवर संवर्धन व संरक्षणाकरीता थेट राष्ट्रीयस्तरावरून धोरणात्मक निर्णय घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

ठळक मुद्दे११ नोव्हेंबर रोजी लोणार सरोवरार ‘रामसर’ स्थळाचा दर्जा मिळाला.एक मोठी उपलब्धी लोणार सरोवराच्या रुपाने जिल्ह्यास मिळाली.

-  नीलेश जोशीलोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा: लोणार सरोवरास ‘रामसर’ स्थळाचा दर्जा मिळाल्यामुळे राष्ट्रीय पातळीवर पर्यावरण विषयक धोरणामध्ये लोणार विकासाला महत्त्व प्राप्त होणार असून लोणार सरोवर संवर्धन व संरक्षणाकरीता थेट राष्ट्रीयस्तरावरून धोरणात्मक निर्णय घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.गेल्या ११ नोव्हेंबर रोजी लोणार सरोवरार ‘रामसर’ स्थळाचा दर्जा मिळाला. त्याचे प्रमाणपत्रही येत्या आठवड्यात मिळले. जागतिक पर्यावरणाच्या दृष्टीने ही एक मोठी उपलब्धी लोणार सरोवराच्या रुपाने जिल्ह्यास मिळाली असून यामुळे लोणार सरोवराच्या संवर्धनासाठी व व्यवस्थापनासाठी तसेच स्थानिक पातळीवरील समस्यांचे निराकरण करण्याकरीता राष्ट्रीय पातळीवरून तांत्रिक सहकार्य मिळण्यास मदत होणार आहे. यासोबतच जागतिक स्तरावरून सरोवर विकास व येथील पर्यावरण अधिक समृद्ध होण्यासाठी मदत मिळण्याचा मार्गही मोकळा झाला आहे. परिणाम स्वरुप लोणार सरोवरातील नैसर्गिक परिसंस्था, अधिवास व त्याच ठिकाणी आढळणारे विशिष्ट स्थानिक प्रजातीचे संवर्धन व त्यांचे संरक्षण करण्यासाठी मोठे पाठबळ या निमित्ताने मिळणार आहे, अशी माहिती अकोला विभागीय वन अधिकारी (वन्यजीव) मनोजकुमार खैरनार यांनी दिली. त्यामुळे येथील विकासास प्राधान्य मिळेल.

लोणार सरोवराची हीपण आहेत वैशिष्ट?लोणार सरोवरासंदर्भात अनेक बाबी आपल्याला ज्ञात असल्या तरी सरोवर परिसरातील गोड्या पाण्याच्या जीवंत झऱ्यामुळे येथे जैवविविधता वृद्धींगत झाली आहे. या परिसरात पक्षांच्या १६० प्रजाती, ४६ सरपटणारे प्राणी आणि १२ प्रकारचे सस्तन प्राणी सरोवर परिसरात आढळतात. कोळ्यांच्या १२० प्रकारच्या प्रजाती येथे असून फुलपाखरांच्या ५५ ते ६० प्रजाती सरोवर परिसरात वैशिष्टयपूर्ण बनवतात. ३० प्रकारच्या वनस्पतींच्या प्रजाती येथे आहेत. अमेरिकेतील स्मिथसोनियन संस्था, युनायटेड स्टेटस ऑफ  जियोग्राफिकल सर्व्हे तसेच जिअेालॉजिकल सोसयटी ऑफ इंडिया व फिजिकर रिसर्च लॅबोरेटरी या सारख्या संस्थांनी लोणार सरोवरावर खूप संशोधन केले असून अभयारम्यातील जैवविविधतेवरही संशोधन होतेय.

टॅग्स :lonar sarovarलोणार सरोवरbuldhanaबुलडाणाenvironmentपर्यावरण