शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

अवैधरित्या साठवलेला तांदूळ व गुटखा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2020 10:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क मलकापूर :   गोडाऊन मध्ये अवैधरित्या साठवून ठेवलेले तांदूळ व गुटखा अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या पथकाने ...

लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर:   गोडाऊन मध्ये अवैधरित्या साठवून ठेवलेले तांदूळ व गुटखा अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या पथकाने धाड टाकुन अंदाजे ३३ लाखांचा मुद्देमाल जप्तीची कारवाई १४ जुलै रोजी रात्री राष्ट्रीय महामार्ग क्र.६ वरील कुंड या परीसरात केली आहे.मलकापुर येथून जवळ असलेल्या कुंड या गावानजिक एका गोडाऊन मधे अवैध रित्या तांदूळ व गुटखा साठवून ठेवला असल्याची गोपनीय माहिती अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या पथकाला मिळाली होती. त्या महितीच्या आधारे सदर गोडाऊन वर छापा टाकला असता तेथे तांदूळाचे ४६६ कट्टे, तसेच महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला मानवी आरोग्यास अपायकारक असलेला विमल गुटखा तसेच चार वाहने यांचा अंदाजे 33 लाखांचा मुद्दे माल जप्त केला आहे.     गोडाऊन मालक आतिकुर रहेमान शफीकुर रहेमान रा. पारपेठ, मलकापुर याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मलकापुर तहसील चे पुरवठा अधिकारी व कर्मचाऱ्यानी घटनास्थळावर येऊन पंचनामा केला आहे. तसेच गुटखा संबंधित कारवाई अन्न व प्रशासन कडे वर्ग करण्यात आली आहे.सदरची कार्यवाही बुलडाणा जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ यांचे आदेशाने, अप्पर पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत खामगाव यांचे मार्गदर्शनाखाली त्यांचे पथकातील पिएसआय चंद्रकांत बोरसे, पोहेकॉ. सुनील देव, पोना. कृष्णा नारखेडे, सुधाकर थोरात, देवेंद्र शेळके, प्रदीप मोठे, पोकॉ. रवींद्र कन्नर, मपोना. मोनाली कुळकर्णी, मपोका. निर्गुना सोनटक्के यांनी केली.

टॅग्स :MalkapurमलकापूरCrime Newsगुन्हेगारी