शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

अवैध वाहतूक बेतली मजुरांच्या जीवावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 11:38 IST

Buldhana Accident News : टिप्पर चालक आणि लेबर कॉन्ट्रॅक्टर यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून चालकास अटक करण्यात आली आहे.

मुकुंद पाठकलोकमत न्यूज नेटवर्कसिंदखेड राजा : शुक्रवारच्या भीषण अपघातामुळे होत्याचे नव्हते झाले. मुळात मजुरांवर ही वेळ का आली असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. सार्वजनिक बांधकाम क्षेत्रातील काही नियम पायदळी तुडविले जात असल्याची अेारड होत आहे.अपघात झाला. त्यात तेरा जणांचा बळी गेला. या घटनेला जबाबदार धरले गेलेल्या टिप्पर चालक आणि लेबर कॉन्ट्रॅक्टर यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून चालकास अटक करण्यात आली आहे. असे असले तरीही अपघाताची खरी जबाबदारी कोणावर हा प्रश्न आहे. मजुरांची अशाप्रकारे अवैध वाहतूक का करण्यात आली? मजुरांना ने-आण करण्यासाठी असलेल्या नियमांचा आणि त्यातील व्यवस्थांचा उपयोग का करण्यात आला नाही असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या प्रश्नांची उत्तरे मिळाल्यास या दुर्घटनेनेस नेमके कोण जबाबदार आहे याचा उलघडा या निमित्ताने होऊ शकतो. त्यादृष्टीने तपासाची गरज आहे.

मृतकांच्या मुळ गावी हाेणार अंत्यसंस्कार अपघातील तेराही मृतकांवर त्यांच्या मध्यप्रदेशातील मुळगावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. जालना सामान्य रूग्णालयात २१ ऑगस्ट राेजी दुपारी मृतकांच्या पार्थीवाचे शवविच्छेदन झाले. त्यानंतर १३ रूग्णवाहीकांव्दारे मृतदेह मध्य प्रदेशातील खरगाेन आणि धार जिल्ह्यातील मुळगावी पाठविण्यात आल्याचे तहसिलदार सुनिल सावंत यांनी सांगितले. दरम्यान मध्यप्रदेश पाेलिस आणि तेथील महसूल विभागाचे कर्मचारीही जालना येथे दाखल झाले हाेते. 

अपघाताच्या प्रत्यक्षदर्शीशी आयजींची चर्चा  हा अपघात झाला तेव्हा तेथे जवळच त्र्यंबक फलटणकर नामक शेतकरी गुरांसाठी गवत कापत होते. फलटणकर यांना अचानक मोठा आवाज झाल्याचे ऐकू आले. त्यामुळे आवाजाच्या दिशेने ते गेले असता तेथे त्यांना फक्त एक लहान मुलगीच पप्पा पप्पा असा आवाज करत प्रथमत: दिसली होती, असे त्यांनी या अपघात स्थळाची पाहणी करण्यासाठी आलेल्या विशेष पोलिस महानिरीक्षक चंद्रकिशोर मीना यांना सांगितले.   अपघात स्थळाला अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्रकिशोर मीना यांनी शनिवारी भेट देऊन पाहणी केली. त्यामुळे शासनस्तरावरून ही या अपघाताची गंभीर दखल घेण्यात आली असल्याचे स्पष्ट होत आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाAccidentअपघात