शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

सुलतानपूर-मेहकर मार्गावर दुचाकी अपघातात पती-पत्नी ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2020 11:02 IST

Buldhana Accident News अज्ञात ट्रकने त्यांच्या दुचाकीला  पाठीमागील बाजूने जबर धडक दिली.

 लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर/सुलतानपूर:  गॅस सिलींडरची वाहतूक करणाऱ्या अज्ञात ट्रकने दुचाकीस पाठीमागून जबर धडक दिल्याने मेहकर येथील पती-पत्नी जागीच ठार झाल्याची घटना १५ नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास सुलतानपूर-मेहकर मार्गावर घडली. दरम्यान, मृतक दांपत्य हे भाऊबीजेच्या पूर्वसंध्येला देऊळगाव वायसा येथे बहिणीकडे भेटीला गेले होते. तेथून परत येत असताना ही दुर्देवी घटना घडली.या घटनेत मुळचे मेहकर तालुक्यातील शेंदला येथील रहिवाशी मात्र व्यवसायानिमित्त गेल्या काही वर्षापासून मेहकर येथे स्थायीक झालेले रामेश्वर सीताराम नालेगावकर (५१) आणि त्यांची पत्नी भाग्यश्री रामेश्वर नालेगावकर (४७) हे दोघे जागीच ठार झाले. हा अपघात मेहकरनजीक असलेल्या एका प्रसिद्ध हॉटेलनजीक घडला. रामेश्वर सीताराम नालेगावकर हे कुटुंबासह मेहकरमध्येच स्थायीक झाले होते. मेहकरमधील शिक्षक कॉलनीत ते वास्तव्यास होते.  दिवाळीनिमित्त असलेल्या प्रसन्न वातावरणातच भाऊबिजेच्या पुर्वसंध्येला रामेश्वर नालेगावकर हे पत्नी भाग्यश्री नालेगावकरसह  दुचाकीवर (एमएच-२८-ऐएल-२४३६) देऊळगाव वायसा येथे बहिणीला भेटायला गेले होते.  रविवारी दुपारी परत येत असताना मेहकर-सुलतानपूर मार्गावर गॅस सिलेंडर घेवून जाणाऱ्या अज्ञात ट्रकने त्यांच्या दुचाकीला  पाठीमागील बाजूने जबर धडक दिली. त्यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला. घटनेची माहीती मिळताच स्थानिकानी मदतीसाठी घटनास्थळी धाव घेतली.या प्रकरणी दत्तात्रय खटावकर यांनी मेहकर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. प्रकरणी घटनेचा पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल नारायण मांटे हे करीत आहे. या मृत पती-पत्नीच्या पश्चात  तीन मुली, नातवंड व जावई व बराच मोठा आप्त परिवार आहे. दरम्यान अलीकडील काळात या मार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे. गेल्या आठवड्यात कार पुलावरून काेसळून दाेन जण ठार झाले हाेते. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाAccidentअपघात