शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

समृद्धी महामार्गावर अपघातात पती-पत्नी ठार, मुलगा जखमी, मृतक व जखमी पुणे जिल्ह्यातील

By निलेश जोशी | Updated: April 4, 2023 21:20 IST

सायंकाळी दुसरबीड नजीक झाला अपघात.

मलकापूर पांग्रा (जि. बुलढाणा):समृद्धी महामार्गावर कार समोरील वाहनावर धडकून झालेल्या अपघातामध्ये पुणे येथील पती-पत्नीचा मृत्यू झाला असून चालक जखमी झाला आहे. हा अपघातात सिंदखेड राजा तालुक्यातील दुसरबीड नजीक ४ एप्रिल रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घडला. ईश्वरी पाध्ये (६०) आणि अमित पाध्ये (६७, दोघे रा. पुणे) अशी मृत्यू पावलेल्या पती-पत्नीची नावे आहेत. वाहन चालवीत असलेला त्यांचा मुलगा आशिष पाध्ये हा जखमी झाला आहे.

हे तिघेही पुण्यावरून नागपूरकडे जात होते. दरम्यान दुसरबीड नजीक आशिष पाध्येने कार चालवीत असतांना त्याचे एमएच-१४-एफजी-९१०७ क्रमांकाचे वाहन नागपूरकडे जात असताना सिंदखेड राजा पोलिस ठाण्याच्या हद्दीत चैनेज नं. ३३१.९ जवळ समोर असलेल्या एमएच-१६-एई-९४६४ क्रमांकाच्या वाहनाला पाठीमागून धडकले व हा अपघात झाला.

यामध्ये आशिष पाध्ये यांची आई ईश्वरी पाध्ये आणि वडील अमित पाध्ये यांचा जागीच मृत्यू झाला तर चालक आशिष पाध्येला मुका मार लागल्याने तो किरकोळ जखमी झाला आहे. त्याला तत्काळ महामार्ग पोलिस एपीआय अरुण बकाल, पोलिस नायक विठ्ठल काळुसे, मिलिंद ताकतोडे व सचिन नाईक, अविनाश राठोड, श्रावण घट्टे, जयकुमार राठोड व सहकाऱ्ायंनी सिंदखेड राजा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविले. तसेच सिंदखेड राजा पोलिसांच्या मदतीने समृद्धी महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली.

टॅग्स :AccidentअपघातSamruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग