शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

काळविटाची शिकार करुन खुलेआम मांसविक्री; बुलडाणा जिल्ह्यातील किन्होळा येथील घटना  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2018 16:42 IST

बुलडाणा : हरिणाची शिकार करुन मांसविक्री सुरु असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी चिखली तालुक्यातील किन्होळा येथे २२ जुलै रोजी सकाळी छापा मारला.

ठळक मुद्दे किन्होळा येथे हरिणाची मास विक्री सुरु असल्याची गुप्त माहिती बुलडाण्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी गणेश टेकाळे यांना २२ जुलै रोजी सकाळी मिळाली. वनपाल भोसले, वनरक्षक समाधान मांटे, वनमजूर वसंता सावळे, परमेश्वर सावळे सरकारी वाहनाने सकाळी आठ वाजता घटनास्थळी पोहोचले. कर्मचाºयांनी घटनास्थळावरुन एक मृत हरिण, मास विकलेल्या काळविटाची कातडी, चार पाय, शिंग व तराजू जप्त केले.

बुलडाणा : हरिणाची शिकार करुन मांसविक्री सुरु असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी चिखली तालुक्यातील किन्होळा येथे २२ जुलै रोजी सकाळी छापा मारला. मात्र कर्मचाऱ्यांना पाहून मांस विकणारे फरार झाले. वनविभागाने घटनास्थळावरुन मृत हरिण, काळविटाचे कातडे, चार पाय, डोके जप्त केले. चिखली तालुक्यातील किन्होळा येथे हरिणाची मास विक्री सुरु असल्याची गुप्त माहिती बुलडाण्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी गणेश टेकाळे यांना २२ जुलै रोजी सकाळी मिळाली. माहितीवरुन वनपाल भोसले, वनरक्षक समाधान मांटे, वनमजूर वसंता सावळे, परमेश्वर सावळे सरकारी वाहनाने सकाळी आठ वाजता घटनास्थळी पोहोचले. किन्होळापासून एक किलोमिटर अंतरावर धोडप मार्गावरील विकास बाहेकर यांच्या शेतातील विहिरीजवळ काही लोक बसलेले दिसले. वनविभागाच्या पथकाला बघितल्यानंतर त्यांनी धूम ठोकली. कर्मचाºयांनी घटनास्थळावरुन एक मृत हरिण, मास विकलेल्या काळविटाची कातडी, चार पाय, शिंग व तराजू जप्त केले. पंचनामा केल्यानंतर मृत हरिणाला बुलडाणा येथे आणले. पशुधन विकास अधिकारी डॉ. मोरे यांनी हरिणाचे शवविच्छेदन केले. त्यानंतर हरिणाचा दफनविधी करण्यात आला. याप्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ च्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दोन अधिकारी रजेवरसध्या वनविभागाचा कारभार रामभरोसे सुरु आहे. उपवनसंरक्षक वाढई यांनी पदभार स्वीकारल्यानंतर दुसऱ्याच दिवशी तब्येत बिघडल्याने ते एक महिन्याचे सुटीवर आहेत. तर एसीएफ गिरी यांच्या हाताची शस्त्रक्रिया झाल्याने ते सुटीवर आहेत. महत्वाचे दोन अधिकारी सुटीवर असल्याने कामकाजावर परिणाम झाला आहे. सध्या सामाजिक वनीकरणचे उपसंचालक पार्डीकर यांच्याकडे उपवनसंरक्षकांचा पदभार आहे.शिकारीकडे वनविभागाने द्यावे लक्ष!वनविभागाच्या नजरा चुकवून जिल्'ातील अनेक ठिकाणी हरिण, नीलगाय, रानडुक्कर, ससा आदी वन्यजिवांची शिकार करुन मासविक्री केली जात असल्याची माहिती मिळाली. काही लोकांनी शिकार हेच उदरनिवार्हाचे साधन बनविले आहे. शेतात, जंगलात जाळे लावून वन्यजिवांची शिकार केली जाते. त्यानंतर जास्त किंमतीत लोकांना मासविक्री करण्यात येते. याकडे वनविभगाने लक्ष देण्याची गरज आहे.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाwildlifeवन्यजीव