शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

तूर खरेदीच्या मुहूर्तावरच आर्द्रतेचा खोडा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 13:44 IST

‘एफएक्यू-नॉन एफएक्यू’च्या गोंधळाने तूर उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत.

- ब्रम्हानंद जाधव लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्ह्यात आठ ठिकाणी हमीभावाने तूर खरेदीला सुरूवात झाली आहे. परंतू खरेदीच्या मुहूर्तावरच आर्द्रतेमुळे तूर खरेदीला खोडा निर्माण होत आहे. ‘एफएक्यू-नॉन एफएक्यू’च्या गोंधळाने तूर उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत.जिल्ह्यात ७६ हजार ५०७ हेक्टर क्षेत्रावर तूर पेरा आहे. सध्या अनेकांची तूर सोंगणी होऊन घरातही आली आहे. परंतू बाजारामध्ये तूरीला केवळ ४५०० ते ५ हजार रुपयांपर्यतच भाव मिळत आहे. त्यामुळे शासनाने ठरवरून दिलेल्या ५ हजार ८०० रुपये हमीभावाने तूरीची विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. केंद्र शासनाने जाहीर केलेल्या आधारभूत दराने तुरीची खरेदी करण्यासाठी १ जानेवारीपासून आॅनलाइन पद्धतीने नोंदणी सुरू करण्यात आली होती. नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना नाफेड अंतर्गत तूर खरेदीची प्रतीक्षा लागलेली होती. दरम्यान, ८ फेब्रुवारी पासून जिल्ह्यातील आठ नाफेड केंद्रावर हमीभावाने तूर खरेदीला सुरूवात करण्यात आली. परंतू सुरूवातीच्या दोन दिवसातच अनेक शेतकºयांना आर्द्रतेच्या नावाखाली तूर विक्री न करता परत जावे लागले.आर्द्रतेचे कारण दाखवून अनेकांची तूर खरेदी होत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. एफएक्यू दर्जाची नसल्याचे कारण दाखवले जात आहे. हमीभावाने तूर खरेदीला आद्रतेचे ग्रहण लागल्याने त्याचा फटका तूर उत्पादक शेतकºयांना बसत आहे.

खरेदी मर्यादेवर नाराजीहमीभावाने तूर खरेदी करण्यासाठी शासनाने हेक्टरी सहा क्विंटल नऊ किलोची मर्यादा घालून दिलेली आहे. तूर खरेदीसाठी असलेल्या मर्यादेमुळे शेतकºयांमध्ये तीव्र नाराजी दिसून येत आहे. यात तूर उत्पादक शेतकºयांचे मोठे होत आहे.

नोंदणीसाठी पाच दिवसहमीभावासाठी १ जानेवारीपासून तूर खरेदीची नोंदणी सुरू झालेली आहे. याची मुदत १५ फेब्रुवारीपर्यंत असल्याने आता शेतकºयांकडे अवघे पाच दिवस उरले आहेत. त्यामुळे नोंदणीसाठी शेतकºयांची लगबग वाढली आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी