शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

मलकापूरात जोडे-चपलांच्या गोदामाला भीषण आग; लाखो रुपयांचा माल जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2020 10:25 IST

जेठवा शू पॅलेसचा लाखो रुपयांचा माल जळून खाक झाला. 

मलकापूरः येथील स्टेशन रस्त्यावर जोडे-चपलांच्या गोदामाला  भिषण आग लागल्याची घटना आज बुधवारी पहाटे ५ वाजेच्या सुमारास घडली. त्यात जेठवा शू पॅलेसचा लाखो रुपयांचा माल जळून खाक झाला. यासंदर्भात अधिक माहिती अशी की,जुगराज जेठमल भंसाली कापड विक्रेते यांचे दुकान दुसऱ्या जागेत शिफ्ट झाले आहे. मात्र त्यांच्मा कुटुंबाचे वास्तव्य वरच्या मजल्यावर आहे.मागिल काही महिन्यापासून त्यांच्या गोडाऊन मध्ये समोरच असलेल्या जेठवा शू पॅलेसचा भाडेतत्वावर जागा घेऊन  लाखो.रुपयांचा माल ठेवण्यात आला होता.वरच्या मजल्यावर भंसाली कुटुंबाचे वास्तव्य आहे.आज बुधवारी पहाटे ५ वाजेच्या सुमारास भंसाली परिवारातील सदस्य व शेजारच्या दुकानदार व वास्तव्य करणाऱ्या नागरिकांना धुरळा निदर्शनास आला. बघता बघता आगेचे डोंब उठल्यावर त्यांनी तात्काळ नगराध्यक्ष अॅड हरीश रावळ यांना माहीती दिल्याने काही मिनिटात पालिकेचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. व दलाच्या कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमाने आग विझवण्यात यश आले.मात्र तोवर भंसाली यांच्या गोडाऊन मधे असलेल्या तीन मोटारसायकल व जेठवा शू पँलेसच्या विविध प्रकारच्या चपला, विविध प्रकारचे बुट असा लाखो रुपयांचा माल जळून खाक झाला. शेजारीच अनेक दुकाने व वरच्या मजल्यावर नागरिकांचे वास्तव्य आहे.पण सुदैवाने कुठल्याही प्रकारची जिवीत हाणी झाली नाही.या घटनेची वार्ता कळताच विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ना.चैनसुख संचेती यांनी घटनास्थळी भेट दिली. पाहणी करून योग्य ती मदत नुकसानग्रस्तास शासनाकडून मिळवून देण्यासाठी त्यांनी  आश्चस्त  केले. आगीच्या घटनेमुळे नागरिकांना एकच गर्दी केली. त्यामुळे एकच खळबळ उडाली. शार्टसर्किट मुळे आग लागली असावी असा अंदाज आहे.(तालुका प्रतिनीधी)

टॅग्स :Malkapurमलकापूरfireआग