घरकुल योजनेला कोरोनाची बाधा; २९०० लाभार्थ्यांना अनुदानाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2020 04:58 PM2020-08-24T16:58:21+5:302020-08-24T16:58:28+5:30

समाज कल्याण विभागाच्या योजनाही निधीअभावी रखडल्याचे चित्र जिल्ह्यात आहे.

housing scheme; Grant waiting for 2900 beneficiaries | घरकुल योजनेला कोरोनाची बाधा; २९०० लाभार्थ्यांना अनुदानाची प्रतीक्षा

घरकुल योजनेला कोरोनाची बाधा; २९०० लाभार्थ्यांना अनुदानाची प्रतीक्षा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: बेघर तसेच दारिद्र रेषेखालील लाभार्थ्यांना घर देण्याच्या उदात्त हेतून सुरू केलेल्या रमाई घरकुल योजनेला कोरोनाची बाधा झाल्याचे चित्र आहे. गेल्यावर्षी २ हजार ९०० लाभार्थ्यांना घरकुले मंजूर करण्यात आली होती. मात्र या लाभार्थ्यांना अनुदानाचा पहिला टप्पाही मिळाला नाही. त्यामुळे घरकुलांची कामे रखडली आहेत. शहरातील घरकुलांची हीच स्थिती आहे.तसेच समाज कल्याण विभागाच्या योजनाही निधीअभावी रखडल्याचे चित्र जिल्ह्यात आहे.
दारिद्र रेषेखालील लोकांना हक्काचे घर मिळावे, या उदात्त हेतुने शासनाने रमाई घरकुल योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गंत जिल्ह्यात २०१९-२० मध्ये २९०० घरकुले बांधण्याचे लक्ष्य निर्धारीत करण्यात आले होते. यापैकी २हजार ६६७ घरकुलांचे जिओ टॅग करण्यात आले. त्यापैकी दोन हजार ४४६ घरकुलांना मंजुरी देण्यात आली होती. तसेच दोन हजार २३१ लाभार्थ्यांचे बँक खातेही प्रमाणीत करण्यात आले होते. मात्र, मार्च महिन्यांपासून कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने शासनाच्या विविध योजना गुंडाळण्यात आल्या आहेत. रमाई घरकुल योजनेसाठीही शासनाकडे निधी नसल्याने २हजार ९०० लाभार्थ्यांना अनुदानाची प्रतीक्षा आहे. जिल्ह्यात सर्वाधिक घरकुले जळगाव जामोद तालुक्यात ५००, त्यानंतर शेगाव ३००, बुलडाणा २००, चिखली ३००, देउळगाव राजा २५०, खामगाव १००, लोणार २००, मलकापूर २००, मेहकर २००, मोताळा १००, नांदुरा २५०, संग्रामपूर १५० तर सिंदखेड राजा १५० घरकुलांचे लक्ष्य होते. या लक्ष्यांकापैकी एकही घरकुल पूर्ण झालेले नाही. नगर पालिका क्षेत्रात समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून रमाई घरकुल योजनेचा लाभ देण्यात येतो. गेल्या वर्षीचे ५३१ लाभार्थ्यांना निधी अभावी अनुदान मिळाले नसल्याचे चित्र आहे. तसेच समाज कल्याण विभागाच्या अनेक योजनांनाही कोरोनाचा फटका बसला आहे.


लाभार्थ्यांना फरकाची रक्कमही मिळेणा
घरकुल लाभार्थ्यांना पूर्वी १ लाख ५० हजार रुपये अनुदान देण्यात येत होते. त्यामध्ये शासनाने एक लाख रुपये वाढ केली आहे. शासनाच्या निर्णयानंतर ज्या लाभार्थ्यांना घरकुल मंजूर झाले आहेत, अशा लाभार्थ्यांच्या फरकाची रक्कम मिळण्याठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. .जिल्ह्यातील २७७ लाभार्थ्यांना अनुदानाची प्रतीक्षा आहे. घरकुल बांधून पूर्ण होउनही फरकाची रक्कम मिळाली नसल्याचे चित्र आहे.

Web Title: housing scheme; Grant waiting for 2900 beneficiaries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.