लोणार: तालुक्यातील पिंपळखुटा येथे एका मजुराच्या घराला शॉर्ट सर्किटने लागलेल्या आगीत २0 हजार रुपयांचे नुकसान झाले. ही घटना १४ जानेवारी रोजी सकाळी ८.३0 वाजेच्या सुमारास घडली. पिंपळखुटा येथे मजुरी करणारे विजय ओंकार घाटे त्यांच्या घराला आज सकाळी शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागून २0 हजार रुपयांचे साहित्य जळाले. गावकर्यांच्या पुढाकारातून आग नियंत्रणात आली. तहसीलदार सुरेश कव्हळे, नगराध्यक्ष राजेश मापारी यांनी घाटे यांना तत्काळ मदत दिली. तर ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून ७ हजार रुपये व तालुका पत्रकार संघाचे गोपाल तोष्णीवाल यांनी आर्थिक मदत दिली.
मजुराच्या घराला आग
By admin | Updated: January 15, 2016 02:12 IST