खामगाव : दिव्यांग विद्यार्थ्याना आता घराजवळचे परीक्षा केंद्र मिळणार असून शासनाच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण अधिकारातून सदर सवलती मिळणार आहे. याबाबत शासनाने निर्णय घेतला असून १ मे २0१५ च्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाची शिक्षण विभागाने अंमलबजावणी सुरू केली आहे. विशेष गरजा असणार्या विद्यार्थ्यांना शिक्षणविषयक सुविधा देणे आवश्यक आहे. त्यासाठी शिक्षण विभागाने समिती नेमली होती. या समितीने केलेल्या शिफारशी शिक्षण विभागाने स्वीकारल्या आहेत. प्रत्येक गटातील अपंगांना या सवलती दिल्या जाणार आहेत. घराजवळील परीक्षा केंद्र किंवा संबंधित दिव्यांग विद्यार्थ्यांना शाळेतच परीक्षेची सुविधा देण्यात येणार आहे. त्यांना प्रतितास २0 मिनिटांचा अधिक वेळ पेपर सोडविण्यासाठी मिळेल कर्णबधिरांना हाच वेळ प्र िततास ३0 मिनिटांचा मिळेल. याशिवाय सर्वच प्रकारातील दिव्यांगांसाठी अनुत्तीर्ण होणार्या विद्या र्थ्याना एकाच किंवा सर्व विषयात मिळून २0 गुणांची सवलत व काही विषयांच्या गटांसाठी विज्ञान विषयाच्या प्रात्यक्षिक परीक्षेऐवजी तोंडी परीक्षेचा पर्याय यात आहे. शासननिणर्यानुसार शिक्षण मंडळाने आवश्यक सूचना संबंधितांना दिल्या आहेत.
दिव्यांगांना घराजवळचे परीक्षा केंद्र !
By admin | Updated: February 19, 2016 01:36 IST