शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

'खान्देश कन्या' अरुणा धाडे यांचा कतार आंतरराष्ट्रीय कला महोत्सवात सन्मान 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 2:14 PM

खामगाव : भूसावळ येथील माहेर असलेल्या खान्देश कन्या आणि सध्या कतार ला वास्तव्यास असलेल्या डॉ. प्रा. अरुणा धाडे यांना कतार इथे नुकत्याच संपन्न झालेल्या कतार आंतरराष्ट्रीय  कला महोत्सवात भारतीय राजदूत श्री पी कुमारन यांच्याहस्ते सन्मान करण्यात आला.

ठळक मुद्देया महोत्सवात ५० हुन अधिक देशातील  जागतिक कीर्तीच्या  १४८ कलाकारांनी भाग घेतला होता. आंतरराष्ट्रीय स्तराच्या सहा दिवसांच्या ह्या सोहळ्यात कलाकारांनी त्यांच्या वैशिष्ट्य पूर्ण शैलीच्या पेंटिंग्स प्रदर्शित केल्या होत्या. अरुणा धांडे यांच्या ‘गोल्ड नून अँड सिल्वर नून’ म्हणजेच ‘सोन दुपार व चंदेरी दुपार’ ह्या दोन वॉटर कलर पेंटिंग्स प्रदर्शनाकरीता निवडल्या गेल्या होत्या.

- योगेश फरपट लोकमत न्युज नेटवर्क खामगाव : भूसावळ येथील माहेर असलेल्या खान्देश कन्या आणि सध्या कतार ला वास्तव्यास असलेल्या डॉ. प्रा. अरुणा धाडे यांना कतार इथे नुकत्याच संपन्न झालेल्या कतार आंतरराष्ट्रीय  कला महोत्सवात भारतीय राजदूत श्री पी कुमारन यांच्याहस्ते सन्मान करण्यात आला. त्यांनी या महोत्सवात ‘वाटर कलर पेंटिंग्स ’ प्रदर्शित केल्या होत्या. कतारची राजधानी दोहा येथे ३१ आॅक्टोबर ते ४ नोव्हेंबरदरम्यान युनेस्को, इंटरनॅशनल अ‍ॅक्शन आर्ट, मिडल इस्ट आर्ट अँड सिल्क पेंटर्स असोसिएशन्स आणि कतार इंटरनॅशनल आर्ट फेस्टिवल तर्फे संयुक्तरित्या कला महोत्सवाचं आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात ५० हुन अधिक देशातील  जागतिक कीर्तीच्या  १४८ कलाकारांनी भाग घेतला होता. आंतरराष्ट्रीय स्तराच्या सहा दिवसांच्या ह्या सोहळ्यात कलाकारांनी त्यांच्या वैशिष्ट्य पूर्ण शैलीच्या पेंटिंग्स प्रदर्शित केल्या होत्या. ह्या शिवाय लाईव्ह पेंटिंग्स प्रकारात आर्टिस्ट्स ना प्रत्यक्ष समसामायिक कलाकारांसोबत आपली कला सादर करण्याचा आणि इतरांकडून शिकण्याचा मौलिक अनुभवही यावेळी  मिळाला. जो प्रत्येक कलाकारासाठी खूप शिकण्यासारखा असतो. या शिवाय कल्चरल टुर, मास्टर आर्ट क्लासेस, पेनल परिसंवाद, कॅटलॉग पब्लिकेशन, मीडिया कव्हरेज इत्यादी भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन होते. या कार्यक्रमास कतारच्या कला, संस्कृती आणि खेल मंत्री सलाह बिन गनीम अल-अली यांनी व्यक्तिगत रित्या सहभागी सर्व कलाकरांना शुभेच्छा देत खास  शाही डिनर चे आयोजन केले होते. अरुणा ह्यांना पेंटिंग्सची आवड लहानपणा पासूनच होती. शाळा कॉलेज मध्ये असतांना कला विषयक स्पर्धांमध्ये त्या नेहमीच आवडीने भाग घेत.  पुढे हौशी कलाकार म्हणून विविध माध्यमांचा वापर करत त्यांनी वॉटर कलर्स माध्यम ह्या त्यांच्या आवडीच्या माध्यमात  स्वत:ला विकसित केले. आतापर्यंत त्यांनी कतार इथे वेगवेगळ्या कला गॅलरीत आपल्या पेंटिंग्स प्रदर्शित केलेल्या आहेत. त्यांचं हायस्कुल पर्यंतचे शिक्षण भुसावळ च्या अहिल्या देवी कन्या शाळेत तर  ग्रॅजुएशन कोटेचा  कॉलेज येथे झालेले आहे. पुढे त्यांनी फायनान्समध्ये डॉक्टरेट पदवी प्राप्त केली. मागच्या १२ वर्षांपासून त्या कतार इथे युनिव्हर्सिटीत प्राध्यापिका आहेत. नोकरी घर सांभाळून त्या आपला पेंटिंग्सचा छंद जोपासतात. या शिवाय त्या स्थानिक मीडिया मासिकात स्तंभ लेखन करतात.  त्यांचे पती डॉ किशोर धाडे हे अपोलो हॉस्पिटल कतार इथे  कार्यरत असून  त्यांच्या दोन्ही मुली उच्च शिक्षण घेत आहेत. आवडीने जपलेल्या आपल्या  छोट्याशा छंदाचं रूपांतर इतक्या मोठ्या आंतरराष्ट्रीय सम्मानात होईल याची त्यांनी कधी कल्पनाही केली नव्हती अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. त्यांच्या ह्या सम्मानाबद्दल त्यांची सर्वस्तरातून प्रशंसा होत आहे. 

भारतीय राजदूतांनी केला गौरव कतार आंतरराष्ट्रीय कला महोत्सवात डॉ. प्रा. अरुणा धांडे यांनी ‘गोल्ड नून अँड सिल्वर नून’ म्हणजेच ‘सोन दुपार व चंदेरी दुपार’ ह्या दोन वॉटर कलर पेंटिंग्स प्रदर्शनाकरीता निवडल्या गेल्या होत्या. कतार चे भारतीय राजदूत श्री पी कुमारन  यांच्या हस्ते त्यांना युनेस्को आणि मिडल इस्ट आर्टिस्ट असोसिएशन संयुक्त विद्यमानाने ट्रॉफी आणि सर्टिफिकेट देण्यात आले.

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगावBhusawalभुसावळInternationalआंतरराष्ट्रीय