शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यातील गाव कारभार्‍यांचा ‘लोकमत’तर्फे सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 01:27 IST

खामगाव: ग्रामविकासामध्ये भरीव योगदान देत गावगाड्याचा कारभार करणार्‍या बुलडाणा जिल्ह्यातील १३ सरपंचांना मंगळवारी शानदार समारंभामध्ये ‘लोकमत’ सरपंच अँवॉर्ड्सने सन्मानित करण्यात आले. खामगाव येथील जलंब रोडवरील पॉलिटेक्निक मैदानावर २0 फेब्रुवारी रोजी ‘लोकमत सरपंच अवॉर्ड्स’ वितरण सोहळा थाटात पार पडला. 

ठळक मुद्दे‘लोकमत’ सरपंच अँवॉर्ड्स’चे थाटात वितरणबुलडाणा जिल्हा गौरव सोहळ्यात भारावून गेले तेरा सरपंच

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: ग्रामविकासामध्ये भरीव योगदान देत गावगाड्याचा कारभार करणार्‍या बुलडाणा जिल्ह्यातील १३ सरपंचांना मंगळवारी शानदार समारंभामध्ये ‘लोकमत’ सरपंच अँवॉर्ड्सने सन्मानित करण्यात आले. खामगाव येथील जलंब रोडवरील पॉलिटेक्निक मैदानावर २0 फेब्रुवारी रोजी ‘लोकमत सरपंच अवॉर्ड्स’ वितरण सोहळा थाटात पार पडला. गावागावांतील विकासकामांची नोंद घेण्यासाठी गावच्या कारभार्‍यांना बीकेटी टायर्स प्रस्तुत ‘लोकमत’ सरपंच अँवॉर्ड्स २0१८ ने गौरविण्याचा निर्णय ‘लोकमत’ने घेतला. पतंजली आयुर्वेद हे या उपक्रमाचे प्रायोजक, तर महिंद्रा ट्रॅक्टर्स हे सहप्रायोजक होते. यावेळी राज्याचे कृषी व फलोत्पादन मंत्री तसेच बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. भाऊसाहेब फुंडकर, खामगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार अँड. आकाश फुंडकर, खामगावच्या नगराध्यक्ष अनिता डवरे, पं.स. सभापती ऊर्मिला शरदचंद्र गायकी, जि.प. सभापती गोपाल गव्हाळे, जिल्हा कृषी अधीक्षक प्रमोद लहाळे, बीकेटी टायर्सचे एरिया मॅनेजर जुबेर शेख व नेत्रानंद अंबाडेकर, महिंद्रा ट्रॅक्टर्सचे व्यवस्थापक संभाजी बढे, महिंद्रा बुलडाणा जिल्हय़ाचे डिलर सुदाम जाधव, लोकमत अकोला आवृत्तीचे निवासी संपादक रवी टाले, लोकमत अकोला आवृत्तीचे सहायक महाव्यवस्थापक रमेश डेडवाल यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. पहिल्या वर्षी केलेल्या आवाहनाला सोलापूर जिल्ह्यातून मोठा प्रतिसाद मिळाला. यासाठी ३00 हून अधिक प्रस्ताव सादर करण्यात आले होते. प्रारंभी दीपप्रज्वलन करून ‘लोकमत’चे संस्थापक स्व. जवाहरलाल बाबूजी दर्डा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर पुरस्काराचे वितरण करण्यात आले. पुरस्कार वितरण सोहळ्याचे प्रास्ताविक अकोला ‘लोकमत’चे निवासी संपादक रवी टाले यांनी केले.

गावपातळीवरील उत्कृष्ट कामांचा सत्कार - जुबेर शेखबीकेटी टायर्सचे एरिया मॅनेजर (अँग्रीसेल) महाराष्ट्र जुबेर शेख म्हणाले, लोकमत सरपंच अवॉर्ड्स म्हणजे गावपातळीवर उत्कृष्ट कार्य करणार्‍या लोकांचा सत्कार होय. यावेळी त्यांनी बीकेटी टायर्स या कंपनीबाबत माहिती देताना सांगितले की, ही कंपनी जागतिक स्तरावर कार्य करते. १३0 देशांना टायर्स निर्यात करते. जगातील सर्व प्रकारच्या ट्रॅक्टर्सचे टायर कंपनीतर्फे बनवले जातात. खास महाराष्ट्रातील माती लक्षात घेऊन कमांडर टायर्स तयार केले आहे. हे शेतकर्‍यांसाठी अतिशय उपयोगाचे आहे. या टायर्सवर विशेष गॅरंटीसुद्धा देण्यात आलेली आहे. यावेळी त्यांनी एव्हीच्या माध्यमातून कंपनीच्या टायर्सचे महत्त्व पटवून सांगितले.

टॅग्स :khamgaonखामगावsarpanchसरपंच