शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

बुलढाण्यात हनी ट्रॅप, जाळ्यात अडकवून एकास लुटले

By भगवान वानखेडे | Updated: September 4, 2022 19:33 IST

अश्लिल व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी.

बुलढाणा : आधी ऑडीओ कॉल करुन अश्लील संभाषण केले. ऐवढेच नव्हे तर व्हिडीओ कॉल करुन अश्लील हावभाव केले. आकर्षित झालेल्या व्यक्तीस नंतर भेटण्यास बोलावले. त्याचवेळी अंगावरील कपडे काढून अश्लील हावभाव केले. मात्र, याचवेळी तिथे पाच जण दाखल होऊन ‘पाच लाख रुपये दे नाही तर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करुन बदनामी करु, असे म्हणत साडेपाच हजार रुपये काढून लुटल्याचा धक्कादायक प्रकार बुलढाण्यात ३ सप्टेंबर रोजी उघडकीस आला.

याप्रकरणातील पाचही आरोपींना बुलढाणा शहर पोलिसांनी अटक केली आहे. तालुक्यातील एका गावातील माजी सरपंच असलेल्या व्यक्तीने बुलढाणा शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली की, आरोपी शारदा ज्ञानेश्वर गायकवाड या महिलेने आधी ऑडीओ कॉलवर करुन संभाषण केले. काही दिवसानंतर व्हिडीओ कॉल करुन कपडे काढून अश्लील हावभाव केले. याच दरम्यान ३ सप्टेंबर रोजी शहरातील सर्क्युलर रोडवरील डीएड कॉलेजवळ भेटण्यास बोलावले. तिथे तक्रारकर्ता व्यक्ती गेला असता आरोपी महिलेने महाविद्यालयाच्या कंपाउंडमध्ये असलेल्या टीनशेडच्या खोलीमध्ये घेऊन गेली. यावेळी महिलेने अंगावरील कपडे काढले. याचदरम्यान आरोपी कृष्णा भास्कर पवार(२४,रा.चिखली रोड),संतोष सखाराम जाधव (३५,रा.सागवन), अजय सुनिल विरसीत (२२,रा.जगदंबा नगर),रुपेश शंकर सोनोने (२२,शिवशंकर नगर,) हे तिथे आले आणि त्यांनी तक्रारदार व्यक्तीच्या अंगावरील कपडे काढले आणि चित्रफित काढली. ‘आम्हाला पाच लाख रुपये दे नाही तर काढलेली चित्रफित सोशल मीडियावर व्हायरल करु अशी धमकी दिली. याचवेळी एकाने खिशात हात घालून साडेपाच हजार रुपये काढून घेतल्याचे तक्रारीत नमूद आहे.

आरडाओरड केली म्हणून झाली सुटकाटीनशेडच्या खोलीमध्ये लुटल्याच्या घटनेनंतर पाचपैकी तीन आरोपींनी तक्रारदाराच्या दुचाकीवर तक्रारदार व्यक्तीस बसविले. ‘चल तुला पोलिसांच्या ताब्यात देऊन जेलमध्ये पाठवतो’ म्हणून पोलीस स्टेशनकडे घेऊन जात असताना मोठी देवी मंदिराजवळ तक्रारादाने पोलिसांना बघून आरडाओरड केली. तेव्हा पोलिसांसमोर हा प्रकार आला. त्यानंतर पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखत प्रकरणाची चौकशी करुन आरोपींना तत्काळ अटक केली.

लुटल्या गेलेला व्यक्ती माजी सरपंचपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणात लुटल्या गेलेला व्यक्ती हा तालुक्यातील एका गावाचा माजी सरपंच आहे. तेव्हा मोठ्या शहराप्रमाणेच आता बुलढाण्यातही हनी ट्रॅपचे जाळे मोठ्या प्रमाणात विणले जात असल्याचे चित्र आहे.

व्हिडीओ कॉल करुन अश्लील हावभाव करणे, नंतर भेटण्यास बोलावून लुटणे असे प्रकार सध्या घडत आहेत. तेव्हा नागरिकांनी अशा महिला, व्यक्तींकडे आकर्षित होऊ नये. तेव्हाच अशा घटना टाळता येऊ शकतात.प्रल्हाद काटकर,पोलीस निरीक्षक, शहर.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी