शहरं
Join us  
Trending Stories
1
कपिल शर्माच्या कॅफेवर पुन्हा गोळीबार; बिश्नोई टोळीच्या गोल्डी-सिद्धूने घेतली हल्ल्याची जबाबदारी
2
‘गर्भवती असाल तर सुट्टी घ्या, पैसे कमावण्यासाठी येता आणि बैठकीला अनुपस्थित राहता” महिला अधिकाऱ्यावर काँग्रेसचे आमदार भडकले
3
RCB फॅन्स... सावधान!! विराट कोहली IPL मधून निवृत्त होणार? 'या' घटनेमुळे चर्चांना उधाण
4
खेडेगावातील लोकांसाठी परवडणाऱ्या बाईक्स, किंमत ५५ हजारांपासून सुरू; येथे पाहा संपूर्ण लिस्ट
5
Gujarat Cabinet: मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या मंत्रिमंडळातील १६ मंत्र्यांनी दिला राजीनामा, गुजरातमध्ये मोठी राजकीय घडामोड
6
"मला सुटी नको, WFH द्या..."; आईच्या अपघातानंतर तरुणीची विनंती, कंपनीचा पुरावे मागत नकार
7
Laxmi Pujan 2025: दिवाळी उंबरठ्यावर, तरी लक्ष्मी पूजेच्या तारखेचा गोंधळ; पंचांग काय सांगतं?
8
अमेरिकेनंतर आता ब्रिटननं दिला भारताला झटका; तेल कंपनीवर लावले आर्थिक निर्बंध, काय होणार परिणाम?
9
Maithili Thakur News: मैथिली ठाकूर यांच्या उमेदवारीला भाजप नेत्यांचाच विरोध, अलीनगरमध्ये राजकारण का तापलं?
10
"ठाण्यात महापौर भाजपाचा बसेल, आम्ही गाफील नाही; स्वबळावर लढण्याची वेळ आली तर..."
11
कष्टाचं फळ मिळालंच! स्मृती मानधनानं दुसऱ्यांदा जिंकला आयसीसीचा स्पेशल अवॉर्ड
12
बाजारात तेजीचा डबल धमाका! सेन्सेक्सची ८६२ अंकांची उडी; गुंतवणूकदारांनी कमावले २.०९ लाख कोटी
13
मोठा नफा कमावूनही कंपनीचा धक्कादायक निर्णय! तब्बल १६,००० कर्मचाऱ्यांना देणार नारळ
14
आशिया कप स्पर्धेत कार जिंकली; आता स्फोटक बॅटर अभिषेक शर्माला ICC कडून मिळालं मोठं बक्षीस
15
पवार कुटुंब यंदा दिवाळी साजरी करणार नाही; सुप्रिया ताईंची सोशल मीडियावर पोस्ट, कारण काय?
16
Diwali Rain Alert: यंदाच्या दिवाळीत गुलाबी थंडी नाही तर पाऊस बरसणार, मुंबईसह महाराष्ट्रात हवामान असं असणार
17
कष्टाचं फळ! ५० रुपये मजुरी, घरोघरी जाऊन विकली भाजी, शिक्षण सोडलं अन् आता RAS ऑफिसर
18
Raigad Crime: पतीच्या हत्येसाठी इन्स्टाग्रामवर अकाऊंट, कृष्णाला बस स्टॅण्डवर भेटायला बोलावलं अन् बॉयफ्रेंड, मैत्रिणीच्या मदतीने काढला काटा
19
Mumbai Crime: एक व्हिडीओ कॉल अन् मुंबईतील व्यक्तीचे 58 कोटी लुटले! 'तुम्ही मनी लॉड्रिंग केलंय' म्हणत...
20
Vasubaras 2025: रमा एकादशी आणि वसुबारस (गोवत्स द्वादशी) एकत्र; कशी करावी पूजा? वाचा लाभ!

जलपर्णीमुळे ऐतिहासिक तलाव धोक्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2020 11:06 IST

शहराच्या जवळ असलेल्या लेंडी तलावाला जलपर्णीचा विळखा अडकल्याने हा तलाव धोक्यात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कलोणार : शहरासह तालुक्याला जलसंकृतीचा मोठा ऐतिहासिक वारसा आहे. लोणार तालुक्यात अनेक जुने बारव, विहिरी, आड, तलाव ऐतिहासिक वारसा आहेत. मात्र मानवी हस्तक्षेप होत असल्याने ही जलसंस्कृती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. शहराच्या जवळ असलेल्या लेंडी तलावाला जलपर्णीचा विळखा अडकल्याने हा तलाव धोक्यात आहे.अतिक्रमण, प्रदूषण आणि दूषित पाण्याचा परिणाम म्हणून पाण्यावर जलपर्णी वाढली आहे. दूषित पाणी, त्यात नायट्रेट-फॉस्फेटचा भरपूर अंश आणि वरून भरपूर सूर्यप्रकाश हे जलपर्णी वाढण्यासाठी मदत करतात. ही वनस्पती या दूषित खाद्यावरच जगते. यामुळे डासांचे प्रमाण वाढून आजारांना निमंत्रण मिळत आहे. लेंडी तलावामध्ये जलपर्णीचे प्रमाण वाढले आहे. पाण्यातील आॅक्सिजन शोषून घेत असल्याने व पाण्यावर सूर्यप्रकाश पडण्यात अडथळा ठरत असल्याने इतर जीवांसाठी सुद्धा हे धोकादायक ठरते. पिंपळखुटा रोडवरील ऐतिहासिक बारव हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. इतिहास संशोधक डॉ.प्रा. सुरेश मापारी यांनी लोणारला जलसंस्कृतीचा वारसा असल्याचे अनेक पुराव्यासह स्पष्ट केले आहे. शहराच्या जवळ असलेला लेंडी तलाव नावाने ओळख असलेल्या तलावाला नागार्जुन तलाव, लिंबी तलाव नावानेहही ओळखले जाते. ऐतिहासिक वारसा असलेल्या ह्या तलावात अनेक वर्षापासून शहराचे घाण सांडपाणी सोडले जात आहे. ऐतिहासिक वारसा असलेला लेंडी तलाव संवर्धन करणे काळाची गरज आहे. (प्रतिनिधी)जलपर्णी वाढलेली दिसली की जिवाणूंचा धोका वाढलेला आहे हे आपण ओळखले पाहिजे. जलपर्णी काढण्याबरोबर या जीवाणूंची वाढ रोखण्यासाठी नायट्रोजन, फॉस्फरस व सेंद्रीय पदार्थांचे पाण्यात मिसळणे थांबवावयास हवे.- अरुण मापारी, पर्यावरण मित्र, लोणार.

टॅग्स :Lonarलोणारbuldhanaबुलडाणा