शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरपासून पंजाब, दिल्लीपर्यंत महापूर! अनेक रस्ते पाण्याखाली, वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा...
2
...तर सर्व मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळणार; सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ सिद्धार्थ शिंदे म्हणाले...
3
सरकारनं जीआर काढला, मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं; नेमका कुणाला मिळणार लाभ? फडणवीसांनी सांगितलं!
4
जीएसटी कपातीबाबत ऑटो कंपन्यांना आधीच माहिती होते? विक्री घसरली की मुद्दाम कमी केली... 
5
हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट म्हणजे काय? मराठा आरक्षणाशी काय संबंध? जाणून घ्या...
6
मोठ्ठा विकेंड? ८ सप्टेंबरला ईदची सार्वजनिक सुट्टी मिळणार? आमदार असलम शेख यांची मागणी, मुख्यमंत्र्यांना पत्र
7
अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाने हादरला, २४ तासांत दुसरा मोठा धक्का; मदतकार्यात अडथळे
8
Big Breaking: ते तिघे आले नाहीत तर नाराजी तशीच राहणार; अखेर मनोज जरांगेंनी उपोषण सोडले
9
रिलायन्स-सुझलॉनसह 'हे' ५ शेअर करणार कमाल! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज; ३८ टक्केंपर्यंत होणार वाढ?
10
जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले
11
कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला DRI ने ठोठावला 102 कोटी रुपयांचा दंड
12
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
13
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
14
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
15
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
16
मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला
17
लग्नाच्या १७ वर्षांनंतर राहुल देशपांडेच्या संसाराचे सूर बिघडले, पत्नीपासून झाला विभक्त
18
चेन स्मोकर आहे किम जोंग उन! उत्तर कोरियाचा हुकूमशहा एका दिवसात किती सिगारेट ओढतो?
19
मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेटिअरवर पहिला GR प्रसिद्ध; वाचा जशाच्या तसा संपूर्ण शासन निर्णय
20
लाखोंचा खर्च टाळला, अवघ्या २ हजारांत केले लग्न; IAS युवराज अन् IPS मोनिका यांची प्रेम कहाणी

साेयीच्या ठिकाणी बदलीसाठी वारंवार याचिका दाखल करणाऱ्या शिक्षकास उच्च न्यायालयाचा दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 12:16 IST

High court slams teacher for repeatedly filing for transfer : चिखली तालुक्यातील सोयीच्या ठिकाणी बदली मिळण्यासाठी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल केली हाेती. 

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्हा प्रशासनाने बदली केल्यानंतर ती रद्द करण्यासाठी वारंवार उच्च न्यायालयात याचिका दाखल करणाऱ्या शिक्षकाची नागपूर खंडपीठाने याचिका फेटाळली आहे. या शिक्षकास पाच हजार रुपयांचा दंडही न्यायालयाने ठाेठावला आहे. त्यामुळे  बदलीसाठी वारंवार याचिका दाखल करणाऱ्या इतर शिक्षकांचेही धाबे दणाणले आहेत. न्यायालयाने हा निकाल ५ मार्च राेजी दिला असून, त्या आदेशाची प्रत जिल्हा प्रशासनाला १६ जून राेजी प्राप्त झाली आहे.जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने बदली केल्यानंतर अनेक शिक्षक उच्च न्यायालयात याचिका दाखल करतात. गेल्या काही वर्षांत शिक्षकांच्या बाजूने निकाल लागल्याने याचिका दाखल करण्याचे प्रमाणे वाढले आहे. जळगाव जामोद तालुक्यातील उमापूर येथे कार्यरत असलेल्या नारायण शंकर सोळंकी या जिल्हा परिषद शिक्षकाने चिखली तालुक्यातील सोयीच्या ठिकाणी बदली मिळण्यासाठी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल केली हाेती. या याचिकेवर झालेल्या सुनावणीअंती  उच्च न्यायालयाने ५ मार्च २०२१ रोजी अंतिम निकाल जाहीर केला. एका ठिकाणाहून दुसरीकडे बदली मिळण्यासाठी एकापाठोपाठ एकाच स्वरूपाच्या अनेक याचिका न्यायालयाकडे दाखल होत आहेत. याची दखल न्यायालय  घेत असल्याचे निकालात म्हटले आहे. बदली करणे ही प्रशासकीय बाब असून, एखाद्याने विनंती केली म्हणून कुठलेही कारण नसताना संबंधित प्राधिकरणाने त्याची बदली करावी व यासाठी संबंधित शिक्षकाने याचिका दाखल करावे, हे प्रकार वाढले आहेत. साेयीचा निकाल लावून घेण्यासाठी याचिका दाखल केल्याने आधीच कामाचा जास्त भार असलेल्या न्यायालयाचा ताण  आणखी वाढतो. यामध्ये न्यायालयाचा वेळ व श्रमाचा अपव्यय होतो. ज्यांना खऱ्या आणि तातडीच्या न्यायाची गरज असते असे लोक न्यायापासून वंचित राहतात,असेही न्यायालयाने निकालात म्हटले आहे.  याचिका फेटाळून लावत न्यायालयाने पाच हजार रुपयांचा दंड ठाेठावला. तो  चार आठवड्याच्या आत जमा करण्याचे बजावले आहे. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाHigh Courtउच्च न्यायालयTeacherशिक्षक