शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यात दमदार पाऊस; धाडमध्ये नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 12:25 IST

पैनगंगा नदीवरील पर्यायी पुल वाहून गेल्यामुळे बुलडाणा-धाड या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यात गेल्या २४ तासात दमदार पाऊस झाला असून पावसाची वार्षिक सरासरी आठ टक्क्यावर पोहोचली आहे. दरम्यान, बुलडाणा जिल्ह्यात काही ठिकाणी हा पाऊस वादळी झाल्यामुळे नुकसान झाले आहे. पैनगंगा नदीवरील पर्यायी पुल वाहून गेल्यामुळे बुलडाणा-धाड या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.गुरूवारी रात्री व शुक्रवारी पहाटेदरम्यान पडलेल्या या दमदार पावसामुळे मलकापूर शहरातही मोठे नुकसान केले आहे. शहराचा विद्यूत पुरवठा त्यामुळे खंडीत झाला आहे. अनेक ठिकाणी वृक्ष अन्मळून पडले आहेत. धाड भागातही गुरुवारी रात्री हा वादळी पाऊस पडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.दरम्यन बुलडाणा जिल्ह्यात लोणार तालुक्यात ४४ आणि मेहकर तालुक्यात ३९ मिमी पावसाची नोंद झाली आहे तर बुलडाणा तालुक्यात ३२, देऊळगाव राजा तालुक्यात २३, मलकापूर तालुक्यात ३८ आणि जळगाव जामोद तालुक्यात २४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे नदीनाल्यांनाही पुर आला असून अनेक ठिकाणी नुकसान झाले असल्याचे वृत्त आहे. मलकापूरलाही फटकाविदर्भाचे प्रवेसद्वार असलेल्या मलकापूर शहरालाही पावसाचा जोरदार फटका बसला आहे. येथील विद्यूत पुरवठा गुरूवारी रात्रीपासूनच खंडीत आहे. वृक्ष उन्मळून पडले आहेत. वीजचे खांबही वाकले आहेत. सोसाट्याच्या वाºयासह हा पाऊस पडला आहे. कोरोना संसर्गाचा कहर येथेअसतानाच पावसानेही गुरूवारी येथे कहर केला.  बुलडाणा-धाड मार्ग बंदबुलडाणा शहरानजीक चार किमी अंतरावर असलेल्या कोलवड नजीक पैनगंगा नदीवरील पुलाचे काम सुरू असल्याने एक पर्यायी कच्चा पुल नदी पात्रात उभारण्यात आला होता. मात्र रात्री पडलेल्या पावसामुळे हा पुल वाहून गेला. त्यामुळे बुलडाणा-धाड मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. दुचाकी चालक मात्र नदी पात्रातील पाण्यातून त्यांची वाहने घेवून जात आहे. पुल वाहून गेल्याने या मार्गावरील जड वाहतूकही बंद आहे.

एक जण वाहून गेलामलकापूर तालुक्यातील जांभूळधाबा येथील एक शेतकरी पावसादरम्यान खोकर नाल्याच्या पाण्यात वाहून गेला. दुचाकीने जांभूळधाबा येथील अनंत विरसेन पाटील हे शेतातून गावाकडे येत असताना ११ जून रोजी रात्री ही घटना घडली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तहसिलदारांनी महसूल यंत्रणेला अलर्ट केले. परिसरातील दहा ते १५ युवकांनीही अनंत पाटील यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र अद्याप ते सापडले नाहीत.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाRainपाऊस