खामगाव: येथील न.प. इमारत आर्किटेक्ट नियुक्ती तसेच कथित अपहारप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले माजी आ. दिलीपकुमार सानंदा यांच्या जामीन अर्जावर बुलडाणा येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी ठेवण्यात आली होती; मात्र या न्यायालयाचे न्यायाधीश सुटीवर असल्याने जामीन अर्जावर सुनावणी आता १८ फेब्रुवारीला होणार आहे. याप्रकरणी दिलीपकुमार सानंदा यांना १८ फेब्रुवारीपर्यंंत १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. दरम्यान, त्यांनी जामिनासाठी बुलडाणा येथील जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज केला होता. या अर्जावर सुनावणी पुढे ढकलण्यात येऊन १६ फेब्रुवारी रोजी ठेवण्यात आली होती; मात्र अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश सुटीवर असल्याने ही सुनावणी आता १८ फेब्रुवारीला होणार असल्याचे समजते. या कोठडीदरम्यान माजी आमदार दिलीपकुमार सानंदा हे प्रकृती अस्वास्थ्यामुळे बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी भरती होते. तसेच आता अकोला येथील सवरेपचार रुग्णालयात असून, त्यांच्यावर तेथे उपचार सुरू आहेत.
सानंदाच्या जामीन अर्जावर १८ रोजी सुनावणी
By admin | Updated: February 17, 2016 02:13 IST