शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क व तत्पर- डॉ. प्रेमचंद पंडीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2020 11:57 IST

जिल्ह्याचे इंसिडंन्ट कमांडर तथा जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडीत यांच्याशी साधलेला संवाद.

- नीलेश जोशीलोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : कोरोना संसर्गाने एकाचा मृत्यू झाल्यामुळे बुलडाणा जिल्हा सध्या चर्चेत आला आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात करण्यात आलेल्या उपाययोजना व एकंदर स्थिती संदर्भात जिल्ह्याचे इंसिडंन्ट कमांडर तथा जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडीत यांच्याशी साधलेला संवाद.

कोरोना संसर्गाशी मुकाबला करण्यासाठी जिल्ह्याची सज्जता कितपत आहे?कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात आवश्यक उपाययोजना केलेल्या आहेत. यंत्रणाही अलर्टवर आहे. तीन ठिकाणी आयसोलेशन कक्ष उभारण्यात आले आहे. महसूल, आरोग्य व जिल्हा परिषद प्रशासनाच्या समन्वयाने दर्जेदारपद्धतीने आपण काम करत आहोत. यंत्रणेचे मनोबलही चांगले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गाफील न राहता कामे करण्याचे निर्देश दिले आहे. त्यानुषंगाने यंत्रणा अलर्टवर आहे.

आतापर्यंत किती जणांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत.?जिल्ह्यातून आपण आतापर्यंत ८६ जणांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविलेले आहेत. पैकी केवळ पाच जणांचे नमुने पॉझीटीव्ह आले असून यातील एकाचा मृत्यू झाला आहे. त्याच्या निकटच्या संपर्कातील चार व्यक्तींचा यात समावेश आहे. पाठविलेल्या नमुन्यांपैकी ६४ नमुने प्राप्त झाले असून त्यापैकी ५९ नमुने हे निगेटीव्ह आहेत.

क्वारंटीन व आयसोलेशनमधून किती रुग्णांना आतापर्यंत सुटी देण्यात आली?जिल्ह्यात आढळेल्या संदिग्ध रुग्णांपैकी आतापर्यंत जवळपास १२७ रुग्णांना आपण सुटी दिली आहे. यामध्ये आयसोलेशन वॉर्डमधील १८ जणांचा समावेश आहे.

स्त्री रुग्णालयाला विशेष दर्जा दिला का?होय. राज्य शासनाने कोरोना संसर्ग झालेल्या व संदिग्ध रुग्णांसाठी प्रत्येक जिल्ह्यासाठी एका विशेष रुग्णालयाची घोषणा केली आहे. त्यानुसार बुलडाणा येथील स्त्री रुग्णालयास हा दर्जा मिळाला आहे. येथेच हॉस्पीटल क्वारंटनी व आयसोलेशन मधील रुग्ण आपण ठेवतो.

हायरिस्क झोनमधील तपासणीबाबत?शहरातील १२ नगरामधील लोकसंख्या ही हायरिस्क झोनमध्ये येते. त्यांची आरोग्य पथकाकंडून तपासणी करण्यात येत आहे. या नागरिकांचेही तपासणीसाठी सहकार्य मिळत आहे. आयसोलेशन व हॉस्पीटल क्वारंटीनमधील रुग्णांचीही प्रोटोकॉल नुसार नियमित तपासणी करण्यात येत आहे. कोरोना पॉझीटीव्ह असलेल्या चार रुग्णांचीही नियमित तपासणी सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान, मृत व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या चौघांना कोरोना संसर्ग झाला आहे. त्यामुळे त्यांच्या संपर्कातील व्यक्तीं ट्रेस आऊट करण्यात आपल्याला यश येत आहे.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसinterviewमुलाखत