शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

‘स्क्रब टायफस’वर नियंत्रणासाठी आरोग्य पथक टेंभूर्णात दाखल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2018 15:32 IST

खामगाव: बुलडाणा जिल्ह्यात ‘स्क्रब टायफस’ने ‘एन्ट्री’ केल्याची धक्कादायक बाब उघडकीस येताच, जिल्हा आरोग्य प्रशासन तातडीने कामाला लागले आहे.

ठळक मुद्दे ‘स्क्रब टायफस’चा पहिला रुग्ण आढळलेल्या टेंभूर्णा येथे शुक्रवारी पहाटेच आरोग्य विभागाचे ११ सदस्यीय   दाखल झाले. या पथकाकडून ताप आणि किटक सर्वेक्षणासह विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.

खामगाव: बुलडाणा जिल्ह्यात ‘स्क्रब टायफस’ने ‘एन्ट्री’ केल्याची धक्कादायक बाब उघडकीस येताच, जिल्हा आरोग्य प्रशासन तातडीने कामाला लागले आहे. ‘स्क्रब टायफस’चा पहिला रुग्ण आढळलेल्या टेंभूर्णा येथे शुक्रवारी पहाटेच आरोग्य विभागाचे ११ सदस्यीय   दाखल झाले असून, या पथकाकडून ताप आणि किटक सर्वेक्षणासह विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.

‘स्क्रब टायफस’ या आजाराचा बुलडाणा जिल्ह्यातील पहिला रुग्ण खामगाव तालुक्यातील टेंभूर्णा येथे आढळल्याचे स्पष्ट होताच, आरोग्य प्रशासनाचे पथक शनिवारी पहाटेच टेंभूर्णा येथे दाखल झाले. या पथकाकडून गावातील नागरिकांचा ताप नमुना सर्वेक्षण करण्यात आले. तसेच किटक सर्वेक्षणावरही यावेळी भर देण्यात आला. काही ठिकाणी उंदराचे पिंजरे लावून किटकाचा शोध घेण्यात येत आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या मदतीने मॅलेथिआॅन फवारणीही करण्यात आली. तसेच तापाचे औषध देण्यात आले. ‘स्क्रब टायफस’ या आजाराची गंभीर दखल घेत टेंभर्णासह संपुर्ण जिल्ह्यात आरोग्य प्रशासनाच्यावतीने उपाययोजना करण्यात येत आहेत.

किटक सर्वेक्षणाद्वारे किटाणुचा शोध!

जिल्हा आरोग्य विभागाच्या पथकाकडून शनिवारी पहाटेच ताप सर्वेक्षण करण्यात आले. तसेच रक्तजल नुमने संकलित करण्यात आल्यानंतर किटक सर्वेक्षणाद्वारे किटाणुचा शोध घेण्यात आला. काही ठिकाणी उंदराचे पिंजरेही या पथकाकडून लावण्यात आले.

जिल्हा हिवताप अधिकारी तळ ठोकून!

जिल्हा आरोग्य केंद्राच्या ४ सदस्यीय पथकासोबतच  अटाळी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि शीघ्र प्रतिसाद पथकाचे ७ सदस्य आणि खामगाव सामान्य रूग्णालयाचे २ असे एकुण १३ सदस्य पहाटेच टेंभूर्णात दाखल झाले. जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. एस.बी. चव्हाण आपल्या पथकासह टेंभूर्णा येथे तळ ठोकून होते. यामध्ये आरोग्य सहायक बी.बी.बढे, ए.जे. बिलावी, बी.सी. जाधव, पी.डी. जाधव,एम.आर. वाघ यांच्यासह आरोग्य विभागाचे पथक पहाटेपासून गावात तळ ठोकून होते.

नागरिकांच्या रक्त नमुन्यांची तपासणी!

आरोग्य विभागाच्या विशेष कृतीदल पथकाकडून टेंभूर्णा येथील नागरिकांच्या रक्तजल नमुने घेण्यात आले.पथकाकडून संकलीत नमुणे तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात येतील.

डेंग्यू आजाराच्या रुग्णसंख्येत विसंगती!

खामगाव शहरात आढळून आलेल्या डेंग्यू आजाराच्या रुग्णसंख्येच्या अनुषंगाने कमालिची विसंगती आढळून येत असल्याचे शनिवारी उघडकीस आले. संपूर्ण जिल्ह्यात डेग्यू आजाराचे ८१ रुग्ण नसल्याचा दावा आरोग्य विभागाने केला आहे. त्यामुळे खामगाव येथील पॅथालॉजीमधील रुग्णसंख्येबाबत विसंगती दिसून येते. रुग्णसंख्येबाबत नियमित माहिती प्रशासनाकडून संकलित केली जात आहे. मात्र, शहरातील चार पैकी दोन पॅथालॉजी लॅबच्या संचालकांनी जिल्हा आरोग्य अधिकाºयांना अहवाल देण्यास नकार दिला. तर एका लॅब मध्ये डेंग्यूचे केवळ ५ संशयीत रुग्ण आढळून आले. त्यामुळे खामगाव येथील डेंग्यू आजाराच्या रुग्णसंख्येबाबत साशंकता निर्माण झाली आहे.

दैनंदिन अहवाल सादर करण्यास खो! 

डेंग्यू या आजारावर प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी तसेच रुग्णसंख्येबाबत माहिती संकलित करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून खामगाव शहरातील खासगी डॉक्टर्स तसेच पॅथालॉजी संचालकांना जिल्हा आरोग्य प्रशासनाने पत्र दिले आहे. मात्र, याबाबत खामगाव शहरातील डॉक्टर्स तसेच पॅथालॉजीकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येते. शनिवारीही दोन पॅथालॉजीच्या संचालकांनी अहवाल सादर केला नसल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगावHealthआरोग्य