शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

अवाजवी वीज देयकांनी वाढविली ग्राहकांची डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2019 18:35 IST

अंढेरा: देऊळगाव राजा तालुक्यात गेल्या कित्येक महिण्यापासुन महावितरणचा दुर्लक्षीत कारभार सुरू असून ग्राहकांना रिडींगनुसार देयके दिल्या जात्नाहीत. त्यामुळे अवाजवी वीज देयके ग्राहकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. 

अंढेरा: देऊळगाव राजा तालुक्यात गेल्या कित्येक महिण्यापासुन महावितरणचा दुर्लक्षीत कारभार सुरू असून ग्राहकांना रिडींगनुसार देयके दिल्या जात्नाहीत. त्यामुळे अवाजवी वीज देयके ग्राहकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. देऊळगाव राजा तालुका अंतर्गत येणारे देऊळगाव मही व अंढेरा, येथे ३३ के. व्ही. उपकेंद्र आहे. देऊळगाव मही येथुन पाडळी शिंदे, सुरा, सरंबा, नागनगांव, सावखेड नागरे तर अंढेरा येथील ३३ के.व्ही. उपकेंद्रा अंतर्गत सेवानगर, पिंप्री आंधळे, मेंडगाव, बांयगाव, शिवणी आरमाळ अशा एकुण १२ गावांना विद्युत पुरवठा केला जातो. परंतु गेल्या एक वर्षापासुन ग्राहकांना दर महिण्याला विद्युत देयके दिली जातात, परंतु ज्या ठेकेदाराला विद्युत रिंडींगचे काम दिले आहे, त्या ठेकेदाराच्या गलथान कारभारामुळे ग्राहकांना रिडींग प्रमाने विद्युत देयके न देता अव्वाच्या सव्वा देयके देऊन ग्राहकांची आर्थिक लुट सुरु आहे. याबाबत देऊळगाव राजाचे उपकार्यकारी अभियंता दहिकर यांना विचारणा केली असता उडवाउडवीचे उत्तरे दिली. तालुक्यात हजारोच्या संख्येने वीज ग्राहक असुन विद्युत मिटरची संख्या हजारोच्या घरात आहे. परंतु ज्या ठेकेदाराकडे विद्यत रिडींग घेण्याचे काम आहे, त्यांत्याकडून अंदाजे मिटर रिडींग टाकुन हजारो रुपयांची दियके दिल्या जात आहेत. महावितरण विभागाकडुन विद्युत बिलाची रक्कम थकबाकीच्या नावाखाली सक्तीने वसुल केल्या जात असुन ती रक्कम भरुन सुध्दा विद्युत बिलात ती रक्कम व्याजासह लागुन येत असल्याने ग्राहकांचे नुकसान होत आहे. तसेच विद्युत बिलावर रिडींग घेतल्याचा फोटो सुध्दा येत नाही. देयकांच्या दुरूस्तीसाठी गाठावे लागते देऊळगाव राजाअंढेरा ३३ के. व्ही. उपकेंद्र येथील कनिष्ठ अभियंता भोकन हे सतत गैरहजर राहत असल्याने ग्राहकांना  देऊळगाव राजा येथे जाऊन विद्युत देयके दुरुस्त करावे लागतात. ग्राहकांना वेळेवर विद्युत देयके दिल्या जात नाही. रिडींग घेणारे सुध्दा गावात येत नसल्याने अडचणी वाढतच आहेत. 

अधिकाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव देऊळगाव राजाचे उपकार्यकारी अभियंता आर. एन. दहिकर यांच्याशी फोनवर विचारणा केली असता या प्रकरणावर दे.मही कनिष्ठ अभियंता प्रफुल्ल चित्तोडे व अंढेराचे कनिष्ठ अभियंता भोकण यांना या विषयावर उत्तरे देण्याचे सांगतो, असे ते म्हणाले. दे.मही कनिष्ठ अभियंता प्रफुल्ल चित्तोडे यांच्याशी फोनवर संपर्क साधला असता; विद्युत देयके हा विषय उपकार्यकारी अभियंता देऊळगाव राजा यांच्या अंतर्गत येत असल्याचे त्यांनी सांगितले. अंढेराचे कनिष्ठ अभियंता भोकन यांच्याशी विचारणा केली असता तुम्हाला नंतरला बोलतो असे सांगून टाळले. या प्रकारामुळे अधिकाºयांमध्ये समन्वयाचा अभाव दिसून येतो. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाmahavitaranमहावितरण