शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

हिवराआश्रम : वीज पुरवठा खंडित केल्यामुळे पाणी पुरवठा ठप्प!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 01:42 IST

हिवराआश्रम:  हिवरा आश्रमला कोराडी प्रकल्पावरून पाणी पुरवठा करण्यात येतो. यावर्षी प्रकल्पात पाणी असूनही ग्रामपंचायत कार्यालय पाणी पुरवठा योजनेचे महावितरणचे विद्युत बिल न भरल्याने नागरिकांची पाण्यासाठी प्रचंड तारांबळ होत आहे.

ठळक मुद्देपाणीपट्टी वसुलीला सहकार्य न करणाºयावर कारवाई करा ग्रामस्थांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कहिवराआश्रम:  हिवरा आश्रमला कोराडी प्रकल्पावरून पाणी पुरवठा करण्यात येतो. यावर्षी प्रकल्पात पाणी असूनही ग्रामपंचायत कार्यालय पाणी पुरवठा योजनेचे महावितरणचे विद्युत बिल न भरल्याने नागरिकांची पाण्यासाठी प्रचंड तारांबळ होत आहे. हिवराआश्रम ग्रामस्थ ग्रामपंचायतचा पाणी कर वेळेवर भरत असूनही ग्रामस्थांना पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र रोष व्यक्त होत आहे.मेहकर तालुक्यातील हिवरा आश्रम येथे कोराडी प्रकल्पावरून  पाणी पुरवठा करण्यात येतो. यावर्षी प्रकल्पात पाणी आहे; मात्र ऐन उन्हाळ्यात पाणी पुरवठा योजनेचे वीज बिल न भरल्यामुळे गेल्या आठ दिवसांपासून या प्रकल्पावरून पाणी पुरवठा बंद आहे. त्यामुळे ग्रामस्थांची पाण्यासाठी तारांबळ उडत आहे.पाणी पुरवठा योजनेचे विद्युत बिल थकीत असल्याने यावर ग्रामपंचायत प्रशासनाने यापूर्वीच उपाय काढायला हवा होता; मात्र ग्रामपंचायत प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने सदर गंभीर परिस्थिती उद्भवली आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र रोष व्यक्त होत आहे. जे ग्रामस्थ पाणी कर वसुलीला सहकार्य करीत नाही, अशा व्यक्तीबाबत ग्रामपंचायत प्रशासनाने कठोर भूमिका द्यावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.येथे वीज वितरण कंपनीचे पॉवर स्टेशन आहे. या पॉवर स्टेशनकडे ग्रामपंचायत कार्यालयाचा कर बाकी आहे, तर ग्रामपंचायतकडे पाणी पुरवठा योजनेचे विद्युत बिल थकीत आहे. या दोन्हीही विभागांनी सामंजस्यांनी भूमिका घेऊन हा प्रश्न निकाली काढणे आवश्यक आहे; मात्र या दोन विभागाचा ग्रामस्थांना विनाकारण त्रास होत असल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाWaterपाणी