शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीतील राष्ट्रीय जनप्रतिनिधी संमेलनात बुलडाण्याचे आमदार हर्षवर्धन सपकाळ यांचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 18:34 IST

बुलडाणा : ग्रामविकासासोबतच पाणीप्रश्नावर सातत्यपूर्ण कार्य करणारे बुलडाणा विधानसभा मतदार संघाचे काँग्रेसचे आमदार  हर्षवर्धन सपकाळ यांना लोकसभेच्या संयुक्त संसदीय समितीच्या वतीने दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय जनप्रतिनिधी संमेलनासाठी निमंत्रीत करण्यात आले आहे.

ठळक मुद्देआमदार  हर्षवर्धन सपकाळ यांना राष्ट्रीय जनप्रतिनिधी संमेलनासाठी निमंत्रीत करण्यात आले आहे. दहा मार्च पासून हे संमेलन संसदेच्या ऐतिहासिक मध्यवर्ती सभागृहामध्ये सुरू झाले आहे. उपाययोजना राबवितांना लोकप्रतिनिधींची भूमिका काय असावी, अशा अनेक बाबींचा यात उहापोह केल्या जात आहे.

बुलडाणा : ग्रामविकासासोबतच पाणीप्रश्नावर सातत्यपूर्ण कार्य करणारे बुलडाणा विधानसभा मतदार संघाचे काँग्रेसचे आमदार  हर्षवर्धन सपकाळ यांना लोकसभेच्या संयुक्त संसदीय समितीच्या वतीने दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय जनप्रतिनिधी संमेलनासाठी निमंत्रीत करण्यात आले आहे. दहा मार्च पासून हे संमेलन संसदेच्या ऐतिहासिक मध्यवर्ती सभागृहामध्ये सुरू झाले आहे. ११ मार्च रोजी या संमेलनाचा समारोप होणार आहे. दरम्यान, महाराष्ट्रातून आ. हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह विधनसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, पुण्याच्या आमदार मेघा कुळकर्णी (भाजप) आणि औरंगाबादचे राष्ट्रवादी काँग्रेचे विधान परिषदेवरील आ. विक्रम काळे यांना या संमेलनात सहभागी होण्याचा मान मिळाला आहे. ‘शाश्वत विकास’ हा मुद्दा घेऊन हे संमेलन यावळी होत आहे. या संमेलनात प्रामुख्याने शाश्वत विकास साध्य करण्याच्या दृष्टीने मानव संसाधन विभाग, कृषी आणि आरोग्य क्षेत्रात काय पावले उचलल्या जावीत, उपाययोजना काय केल्या जाव्यात यासोबतच अशा उपाययोजना राबवितांना लोकप्रतिनिधींची भूमिका काय असावी, अशा अनेक बाबींचा यात उहापोह केल्या जात आहे. त्यानुषंगाने बुलडाण्याचे आ. हर्षवर्धन सपकाळ यांचा या क्षेत्रात चांगला अनुभव आहे. पैनगंगा नदी पुनरुज्जीवन प्रकल्पासह, पाणीप्रश्नी तथा ग्रामविकास आणि पंचायत राज या विषयाचा त्यांचा गाढा अभ्यास आहे. सोबतच अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सचिव असलेले हर्षवर्धन सपकाळ हे काँग्रेसच्या राजीव गांधी पंचायत राज संघटनचे राष्ट्रीय उपाध्यक्षही आहे. पंचायतराज व्यवस्था या विषयाचा त्यांचा गाढा अभ्यास आहे

टॅग्स :buldhanaबुलडाणा