शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

साेशल मीडियावरही महिलांचा छळ : ३२ तक्रारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 11:21 IST

Harassment of women on social media : सन २०१८ ते २०२१च्या जुलैपर्यंत ३२ महिलांनी अशा प्रकारच्या तक्रारी केल्या आहेत. 

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : सध्याच्या आधुनिक युगात माेबाईलचा वापर माेठ्या प्रमाणात वाढला आहे. अनेकांना फेसबुक आणि व्हाॅटसॲपचे वेडच लागल्याचे चित्र आहे. यामध्ये महिलांचाही समावेश आहे.  काही विकृत मानसिकतेचे लाेक साेशल मीडियावरही महिलांचा छळ करीत असल्याचे चित्र आहे. अनेक महिला तक्रार करण्यासाठी पुढे येत नाही़.  सन २०१८ ते २०२१च्या जुलैपर्यंत ३२ महिलांनी अशा प्रकारच्या तक्रारी केल्या आहेत. अनेक मुलींचे फेसबुक, व्हाॅटसॲप, इन्स्टाग्राम, टि्वटर आदींवर अकाऊंट आहे़ बहुतांश मुली आपले फाेटाे समाज माध्यमावर टाकत असतात.  त्याचा दुरुपयाेग करून काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे लाेक मुली आणि महिलांना ब्लॅकमेल करतात़ काही मुले मुलींना वारंवार फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतात, अश्लील मॅसेज पाठवणे, व्हाॅटसॲपवर अश्लील चित्रफित टाकणे आदी प्रकार करून मुलींचा छळ करीत असल्याचे चित्र आहे.  अनेक मुली बदनामीच्या भीतीने पाेलिसात तक्रार करीत नसल्याने अशा गुन्हेगारांवर वचक बसत नाही. त्यामुळे तक्रार करण्याची गरज आहे.

तक्रार न करणाऱ्यांची संख्या अधिक गत काही वर्षांत हे प्रकार माेठ्या प्रमाणात वाढले आहेत़ अनेक मुली बदनामीच्या भीतीने तक्रारच करीत नाहीत़ अनेकदा युवती, महिलांना अश्लील मॅसेज येतात. अश्लील व्हिडिओ त्यांच्या मोबाईलवर पाठविण्यात येतात. यात नातेवाईक, जवळच्या महिला, शोषण करून अश्लील व्हिडिओ तयार करतात. हे व्हिडिओ दाखवून त्यांचे वारंवार शोषण करतात. परंतु बदनामीच्या भीतीने अनेक युवती, महिला तक्रार करण्यास पुढे येत नाहीत. अशा महिलांनी पुढे येऊन तक्रार करण्याची गरज आहे़.

अनेक महिलांचा फेसबुक, व्हाॅटसॲप, इन्स्टाग्रामवर छळ केला जाताे़ बदनामीच्या भीतीने अनेक महिला व मुली तक्रार करीत नसल्याचे चित्र आहे.  असा प्रकार घडलेल्या युवती व महिलांनी समाेर येऊन तक्रार करावी.  महिला आणि युवतींचे नाव गुप्त ठेवले जाते.   - प्रदीप ठाकूर, पाेलीस निरीक्षक,सायबर सेल 

टॅग्स :buldhanaबुलडाणाSocial Mediaसोशल मीडियाcyber crimeसायबर क्राइम