शहरं
Join us  
Trending Stories
1
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
2
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
3
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
4
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
5
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
6
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
7
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
8
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
9
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
10
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
11
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
12
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
13
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
14
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
15
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
16
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
17
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
18
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
19
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
20
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...

गोल्ड फिंगरच्या कारखान्यात चक्क गुटख्याचा साठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 11:27 IST

संबंधितांचे दुर्लक्ष होत असल्याने एमआयडीसीत गत काही दिवसांपासून अवैध धंदे वाढीस लागल्याचे चित्र आहे.

- अनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: राज्यात गुटखा विक्री, साठा, वाहतूक, वितरण आणि उत्पादन करण्यावर प्रतिबंध आहे. मात्र, तरीही खामगाव एमआयडीसीतील एका पोंगा पंडित (गोल्ड फिंगर) आणि फ्रायम निर्मिती कारखान्यात गुटखा साठा लपविण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एमआयडीसीतील बंद आणि सुरू असलेले उद्योग अवैध व्यवसायाचे अड्डे बनल्याचे दिसून येते. याकडे संबंधितांचे दुर्लक्ष होत असल्याने एमआयडीसीत गत काही दिवसांपासून अवैध धंदे वाढीस लागल्याचे चित्र आहे.खामगाव येथील एमआयडीसीतील एका पोंगा पंडित (गोल्ड फिंगर), कुरकुरे, फ्रायम, बटाटा आणि केला चिप्स निर्मितीचा कारखाना भाडेपट्ट्याने घेण्यात आला. पोंगा पंडित निर्मितीसाठी परवानगी असलेल्या या कारखान्यात मुळ उद्देशाला हरताळ फासत गुटख्याचा साठा करण्यात आला.या गुटखा साठ्यावर अन्न व औषध प्रशासन आणि पोलिसांच्या संयुक्त विद्यमाने कारवाई करण्यात आली.वडिल हमाल आणि भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या एका मजुराने ३६ लाखांचा गुटखा खरेदी, वाहतूक आणि साठा केलाच कसा? असा प्रश्न उपस्थित होत आहे. नि:पक्ष चौकशी आणि कारवाई झाल्यास अनेक बडे मासे गळाला लागू शकतात.

‘नाराजी पिटीशन’वर आज सुनावनी!प्रतिबंधीत गुटखा साठा प्रकरणी खामगाव जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल ‘नाराजी पिटीशन’वर उद्या बुधवार १९ आॅगस्ट रोजी सुनावनी होणार आहे. अटकेतील आरोपी राजू गव्हांदे यास जामीन नाकारण्यात यावा, यासाठी त्याला न्यायालयात जामीन नाकारण्याचा अर्ज (नाराजी पिटीशन) अ‍ॅड. एस. डब्ल्यू. शेगोकार यांच्यामार्फत दाखल केले आहे.

टॅग्स :khamgaonखामगावCrime Newsगुन्हेगारी