Gulababab's palkhi is on the route to Pandharpur | गुलाबबाबांची पालखी पंढरपूरसाठी मार्गस्थ
गुलाबबाबांची पालखी पंढरपूरसाठी मार्गस्थ

वरवट बकाल ता. संग्रामपूर : संग्रामपूर तालुक्यातील तीर्थ क्षेत्र काटेल धाम येथील श्री संत गुलाब बाबा यांची पायदळ पालखी तीर्थ क्षेत्र काटेल धाम येथून  पंढरपूर साठी प्रस्थान झाली आहे. संस्थानकडून प्रस्थान सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली होती. १० जून रोजी सकाळी भक्ती मय वातावरणात गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला भजन गीतांच्या गजरात मोठया उत्साहात पायदळ पालखी वरवट बकाल मार्गे अकोला जिल्ह्यातून मार्गस्थ झाली आहे. पंढरपूर येथे पांडुरंगाच्या दर्शनासाठी ही वारी निघाली आहे. यामध्ये हजारो भाविक भक्त सहभागी झाले आहेत. या पायदळ पालखी सोहळा वारीत असलेल्या वारकºयांना पंढरपूर मागार्ने ठीक ठिकाणी व रस्त्याने अल्पोपहार  व भोजनाची तसेच मुकामी राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. हा पालखी सोहळा पंढरपूर ला आषाढी एकादशी १६जुलै रोजी पोहचणार आहे. या पायदळ पालखी सोहळ्यासाठी काटेल धाम संस्थान अध्यक्ष बाजीराव भाटिया, व्यंकटराव पाटील, वासुदेव राऊत व्यवस्थापक, समन्वयक पवन महाराज पुंडे, सेवकराम महाराज नाळे यांनी प्रयत्न केले. राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष संगीतराव भोंगळ आदी राजकीय मंडळींनी पालखीचे दर्शन घेतले.


Web Title: Gulababab's palkhi is on the route to Pandharpur
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.