लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव : शहर परिसरात भुरट्या चोऱ्या वाढत असून दुचाकी तसेच स्पिंक्लरचे साहित्य लंपास झाल्याची घटना २३ मे पूर्वी घडली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. शेगावातील अग्रसेन चौकात राहणारे श्रीकांत अनिल पाडिया यांची दुचाकी अज्ञात चोरट्याने २१ मे रोजी रात्रीदरम्यान अग्रसेन चौकातून लंपास केली. तर दुसऱ्या घटनेत गौलखेड येथील रामेश्वर दत्तुजी शेजोळे यांच्या गौलखेड येथे असलेल्या गोठ्यातून अज्ञात चोरट्याने स्पिंक्लरचे साहित्य लंपास केले. या दोन्ही घटनेप्रकरणी पोलिस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
शेगावात वाढल्या भुरट्या चोऱ्या
By admin | Updated: May 24, 2017 19:25 IST