चिखली : तालुक्यातील केळवद येथे संजीवनी बहूद्देशीय शिक्षण प्रसारक संस्थेच्यावतीने आयोजित सामूहिक विवाह सोहळय़ाचे आयोजन करण्यात आले होते. यात १२ जोडपी विवाहबद्ध झाली आहेत.केळवद ग्रामपंचायत कार्यालय परिसरात ५ मे रोजी पार पडलेल्या या विवाह सोहळय़ानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विदर्भ एनजीओ फेडरेशनच्या ममता नेताम होत्या, तर प्रमुख उपस्थितीत सामूहिक विवाह सोहळय़ाचे प्रनेते शिवाजीराव नवघरे, सुभाष बोंदाडे, सरपंच द्वारका भोसले, अंनिसच्या प्रतिभा भुतेकर, अँड.कस्तुरे, पत्रकार संतोष किरनाके, संजीवनी जाधव, मुख्याध्यापक गाडेकर यांच्यासह उपसरपंच, पोलीस पाटील, ग्रा.पं.सदस्यांची उपस्थिती होती. यावेळी प्रमुख उपस्थितांची मार्गदर्शनपर भाषणे झाली. प्रास्ताविक नवृत्ती जाधव यांनी केले. यावेळी पार पडलेल्या सामूहिक विवाह सोहळय़ात दोन आंतरजातीय जोडप्यांसह १२ जोडप्यांचे विवाह पार पडले. संचालन गजानन केकाण तर आभार विजय पळसकर यांनी मानले. यशस्वीतेसाठी सिने अभिनेत्री हांसीनी उचित यांनी परिङ्म्रम घेतले.
सामूहिक विवाह सोहळय़ात १२ जोडपी विवाहबद्ध
By admin | Updated: May 6, 2017 02:27 IST