शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

‘जलयुक्त शिवार’च्या कामांमुळे वाढली साखरखेर्डा परिसरातील भूजल पातळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 13:39 IST

साखरखेर्डा : अवर्षणग्रस्त तालुका म्हणून ओळख असलेल्या सिंदखेड राजा तालुक्यातील साखरखेर्डा परिसरातील पाणीटंचाईची ही जिल्ह्यासाठी नवी नाही. त्यामुळे या टंचाईग्रस्त भागात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत विविध कामे  घेण्यात आली. त्याचे सकारात्मक दृश्य परिणाम आता समोर येत आहेत.

ठळक मुद्देगाळ काढल्याने तलावातील जलसाठ्यात वाढ

साखरखेर्डा : अवर्षणग्रस्त तालुका म्हणून ओळख असलेल्या सिंदखेड राजा तालुक्यातील साखरखेर्डा परिसरातील पाणीटंचाईची ही जिल्ह्यासाठी नवी नाही. त्यामुळे या टंचाईग्रस्त भागात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत विविध कामे  घेण्यात आली. त्याचे सकारात्मक दृश्य परिणाम आता समोर येत आहेत.२६ हजार लोकसंख्या असलेले साखरखेर्डा हे गाव आहे. गावच्या शिवारात मोठ्या प्रमाणावर जलयुक्त शिवारची कामे करण्यात आली. त्यामुळे वाहून जाणारे पाणी जमिनीत मुरत आहे. त्यामुळे परिसरातील विहीरींची पाणीपातळी वाढली आहे. त्यामुळे रब्बी हंगामामध्ये शेतकर्यांना सिंचनासाठी या पाण्याचा उपयोग चांगल्या पद्धतीने होत आहे.येथील पाणीटंचाईची समस्याही हे अभियान राविल्यामुळे आता निकाली निघण्याच्या मार्गावर आहे. तसे या गावाला ऐतिहासिक आणि पौराणिक महत्त्व सुद्धा आहे. गावाच्या अवती भवती महालक्ष्मी, गायखेडी व काळ्या पाण्याचे असे तीन तलाव आहे. गावाला कोराडी प्रकल्पातून पाणी पुरविल्या जाते. गाव शिवारात ९० कामे उपक्रमातंर्गत मंजूर करण्यात आली होती तर ७९ कामे पुर्ण करण्यात आली आहेत. या संपूर्ण कामांची माहिती सिमनीक संकेतस्थळावर अपलोड करण्यात आली.

शेतकर्यांचा मिळाला प्रतिसादसाखरखेर्डा गावच्या शिवारात अभियानातंर्गत सिमेंट नाला, बांधातील गाळ काढणे आणि खोलीकरण यासह ढाळीच्या बांधाच्या कामांना शेतकर्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पहिल्या वर्षी साखरखेर्डा गावाची निवड झाली आहे. त्याचप्रमाणे परिसरात १७ बंधार्यांचे खोलीकरण आणि रुंदीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे परिसरातील विहीरींना जलसंजीवनी मिळाली. त्याचप्रमाणे गावाच्या आसपास असलेल्या महालक्ष्मी, गायखेडी व काळ्या पाणी असलेल्या तलावातील लोकसहभागातून मोठ्या प्रमाणावर गाळ काढण्यात आला होता. १३ ठिकाणी नाला खोलीकरणाचीही कामे झाली आहे. तीनही तलावामधून दोन लाख ३० हजार ट्रॉली गाळ काढण्यात आला होता. त्यामुळे वर्षभरात येथील विहीरींना चांगले पाणी आले. 

डाळींब शेतीकडे वळले शेतकरीया भागातील शेतकरी आता डाळीं शेतीकडे वळले आहेत. काही ठिकाणी फुलशेतीही सुरू झाली आहे. भूजल पातळीतही या भागात झालेल्या कामामध्ये पूर्वीच्या तुलनेत सुधारणा झाली आहे.

टॅग्स :Waterपाणी