हिवरा आश्रम, दि. १८- एखादी चोरीची घटना घडली, तर पोलीस प्रशासनासह स्थानिक नागरिकही सतर्क होतात. याउलट मात्र येथे पहिल्या दिवशी चोरीची घटना घडल्यानंतर पोलिसांनी सतर्क राहून गस्त वाढविण्याची गरज असतानाही चोरट्यांनी पोलिसांना शह देत तब्बल दोन दिवस किराणा दुकानात चोरी करून पोलिसांना आव्हान देण्याची घटना घडत आहे.येथील बसस्थानकावरील अगदी वर्दळीच्या ठिकाणी असलेले श्यामसुंदर सुंदरलाल लद्धड यांचे लद्धड किराणा अँण्ड जनरल स्टोअर्सच्या दुकानाचे शटर वाकवून चोरट्यांनी २५ ते ३0 हजार रुपयांची रोकड व सिगारेट माल लंपास केला. पोलीस तपास सुरू असतानाच याच घटनेची पुनरावृत्ती घडली. १७ मार्चला ग्रामपंचायत कार्यालयाच्या गाळ्यात असलेले दीपक बोधनकर यांचे किराणा दुकानचे शटर वाकवूनच माल व रोकड लंपास करण्यात आली. ही घटना होते न होते, तर १८ मार्चला शनिवारी सकाळी बोधनकर यांच्या दुकानच्या बाजूचे मुरलीधर गारोळे यांचे किराणा दुकान चोट्यांनी त्याच पद्धतीने फोडून यातील माल व रोकड लंपास केली. लागोपाठ चोरट्यांनी रोडला लागून असलेले, वर्दळीच्या ठिकाणी असलेले किराणा दुकाने फोडल्या जात असल्याने सर्वसामान्य नागरिक भयभीत झालेले आहेत. त्यामुळे पोलिसांनी आता गस्त वाढविण्याची गरज आहे.
किराणा दुकानचे शटर वाकवून रोकड लंपास
By admin | Updated: March 19, 2017 02:23 IST