शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामसभा बळकटीकरणाला ‘मूळपत्रिके’चे कोंदण!

By admin | Updated: May 16, 2016 01:26 IST

चिखली तालुक्यातील मुंगसरी ग्रामपंचायतचा अभिनव उपक्रम.

सुधीर चेके पाटील /चिखली (जि. बुलडाणा)गावच्या विकासाचा गाडा व्यवस्थित चालण्यासाठी व ग्रामपंचायतीचा कारभार पारदश्री व्हावा, यासह इतरही अनेक महत्त्वपूर्ण बाबींसाठी गावपातळीवर ग्रामसभेला विशेष महत्त्व आहे. मात्र, ग्रामपातळीवर या ग्रामसभेबद्दल नागरिकांमध्ये प्रचंड अनास्था दिसून येते. अनेक गावांत ग्रामसभा होतच नाहीत, ज्या होतात त्या कागदोपत्नी होतात, त्यामध्ये ठरावही संमत होतात. ग्रामस्थांना त्याची पुसटसी कल्पनाही नसते. गावातील काही प्रतिष्ठित, सत्ताधारी एकित्रत येतात व त्यांच्या निर्णयांना ग्रामसभेचे निर्णय म्हणून नक्की करतात. तर ग्रामसभा घ्यायचा प्रयत्न केला तरी लोक जमतच नाहीत, त्यांचे महत्त्व त्यांना वाटत नाही, ही स्थिती गावपातळीवर सर्वदूर आहे. मात्र, हे चित्र बदलावे, ग्रामसभेचे बळकटीकरण व्हावे व प्रत्येक ग्रामसभेला ग्रामस्थांची १00 टक्के उपस्थिती लाभावी, या उदात्त हेतूने तालुक्यातील मुंगसरी ग्रामपंचायतीने एक अभिनव उपक्रम हाती घेतला असून, ग्रामसभेचे निमंत्रण देण्यासाठी चक्क मूळपत्रिका त्यांनी छापल्या आहेत.लग्न समारंभ असो अथवा सणवार सासरी नांदायला गेलेल्या लेकीला तसेच तिच्या सासरकडील मंडळींना सहकुटुंब आमंत्रण देणे व मुलीला माहेरी आणण्यासाठी आजही मुराळी परंपरा विशेषत: वर्‍हाडात जपल्या जाते. मात्र; काळ बदलला तसे या मुराळीचे स्वरूपही बदलले. पूर्वी साधे लग्नाचे निमंत्रण देण्यासाठी लग्नपत्रिकेसह शिदोरी व इतर मानपानाच्या प्रथा जोपासल्या जात होत्या. कालांतराने त्यात बदल झाला, बैलगाड्या कालबाहय़ झाल्या. शिदोरी प्रथा काही प्रमाणात कमी झाली. म्हणून अक्षतांचे पाकिटे व त्यासोबत जाण्या-येण्याचे भाडेही पाहुणे मंडळीने दिले जात होते. तो काळही मागे पडला आणि आता मुराळीची जागा घेतली आहे ती ह्यमूळपत्रिकेह्णने. एखाद्या घरात लग्नसमारंभाचा योग आल्यानंतर लगेच पत्रिका काढल्या जातात व त्या सर्वांपर्यंत पोहचविण्यासाठीची धडपड सुरू होते. त्यातही निमत्रंण पाठवित असताना आप्तस्वकीय, जवळचे मित्न, नातेवाइकांना आवर्जून मूळपत्रिका दिल्या जातात. त्याचा परिणामही तसा सकारात्मक असतो. अमूक एका लग्नाची आपल्याला मूळपत्रिका दिली आहे, तेव्हा हे लग्न टाळणे शक्य नाही. अशी एक भावना प्रत्येकामध्ये निर्माण होते. ही सकारात्मक भावना गावाच्या विकासासाठी प्रत्येकाच्या मनात रूजावी व ग्रामविकासाचा महत्त्वाचा भाग असलेल्या ग्रामसभेला गावातील प्रत्येकाने सहकुटुंब उपस्थित राहावे; यासाठी तालुक्यातील मुंगसरी ग्रामपंचायतीने अभिनव उपक्रम राबविण्यास सुरुवात केली असून, ग्रामसभेला नागरिकांची १00 टक्के उपस्थिती लाभावी, यासाठी चक्क ग्रामसभेचे निमंत्रण देणारी मूळपत्रिकाच त्यांनी काढली आहे. सुमारे ८00 लोकवस्तीचे मुंगसरी या गावाने सरपंच कल्पना गाडेकर यांच्या नेतृत्वात आदर्श ग्रामकडे वाटचाल चालविली आहे. तालुक्यातील पहिले हगणदरीमुक्त गाव म्हणूनही या गावाने लौकिक मिळविला आहे.