शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांनी घेतली राज ठाकरेंची भेट; निकालापूर्वी कोणत्या मुद्द्यांवर चर्चा?
2
मनोज जरांगे पाटलांनी उपोषणाची तारीख बदलली; निर्णयामागील कारणही सांगितलं!
3
फडणवीसांच्या जवळच्या आमदाराने उद्धव ठाकरेंना फोन केला? प्रसाद लाड यांनी सगळंच सांगितलं
4
'मतमोजणीत गडबड आढळल्यास व्हिडिओ पाठवा', काँग्रेसने जारी केला हेल्पलाइन क्रमांक
5
छगन भुजबळ कोणत्या पक्षात? जयंत पाटील म्हणाले,"उद्या निकालानंतर सांगतो...";
6
...तर मी स्वत:ला संपवून घेईन: सोनवणेंचा निवडणूक अधिकाऱ्याला इशारा; पंकजा मुंडे काय म्हणाल्या?
7
लोकसभेच्या निकालाआधीच पवारांकडून विधानसभेची तयारी सुरू?; भाजपच्या माजी आमदाराने घेतली भेट
8
देशात इंडिया आघाडीचे सरकार येईल? काँग्रेसचे 'चाणक्य' डीके शिवकुमार यांनी केली ही भविष्यवाणी
9
चोराचा अजब कारनामा; चोरी करायला घरात शिरला अन् AC च्या थंडाव्यात झोपी गेला, सकाळी...
10
"मोदींची ध्यानधारणा हीदेखील 'मूक पत्रकार परिषद'च होती"; संजय राऊतांचा आयोगावर पलटवार
11
कशी होते मतांची मोजणी? EVM-VVPAT स्लिप्सचे काय होते? जाणून घ्या संपूर्ण ABCD...
12
पुलवामामध्ये मोठी चकमक; टॉप कमांडर रियाझ अहमद डारसह आणखी एकाला कंठस्थान
13
राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा Exit Poll आला; इंडिया आघाडीला किती जागा मिळणार, पाहा...
14
कार जाऊ द्या, आता बाईकमध्येही आली 'एअरबॅग'; होंडाच्या या दुचाकीचा किंमत किती माहित्येय?
15
भारतात आल्यावर पहिल्यांदा मृणाल दुसानीसने या पदार्थावर मारला ताव
16
मोदी तिसऱ्यांदा सत्तेत आले तर काहीतरी भव्य दिव्य होणार; 10 हजार पाहुणे, स्थळ अन् तारीखही ठरली...
17
आरोग्यासाठी फायदेशीर असणारं लिंबू पाणी नेमकं कधी प्यावं?; जाणून घ्या, योग्य वेळ
18
शेअर बाजार 'रेकॉर्ड हाय'वर बंद; 'Modi Stocks'नं एकाच दिवसात केलं मालामाल, अदानींचे शेअर्स रॉकेट
19
लोकसभा निकालाआधीच बॉलिवूडमध्ये मोदींचा डंका! 'या' खानने BJP चं केलं अभिनंदन, म्हणाला...
20
लोकसभेच्या निकालाआधीच उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; निवडणूक आयोगाचे कारवाईचे आदेश

बुलडाणा जिल्हय़ातील ग्रामपंचायत निवडणूक : छाननीमध्ये १६ अर्ज बाद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 1:53 AM

बुलडाणा: दुसर्‍या टप्प्यात बुलडाणा जिल्हय़ातील ४३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत असून, मंगळवारी झालेल्या छाननदरम्यान, सदस्य पदाकरिता अर्ज केलेल्या १५ जणांचे तर सरपंच पदाकरिता एकाचा असे १६ नामांकन अर्ज बाद झाले आहे.

ठळक मुद्देदुसर्‍या टप्प्यात ४३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकागुरुवारी होणार लढतीचे चित्र स्पष्ट

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: दुसर्‍या टप्प्यात बुलडाणा जिल्हय़ातील ४३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत असून, मंगळवारी झालेल्या छाननदरम्यान, सदस्य पदाकरिता अर्ज केलेल्या १५ जणांचे तर सरपंच पदाकरिता एकाचा असे १६ नामांकन अर्ज बाद झाले आहे. दरम्यान, १४ डिसेंबरला नामांकन अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असल्याने त्या दिवशी प्रत्यक्ष लढतीचे चित्र स्पष्ट होईल. तूर्तास सदस्य पदाकरिता ९६४ नामांकन अर्ज आणि सरपंच पदाकरिता २७0 अर्ज पात्र ठरले आहेत.नामांकन अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवारी सदस्य पदाकरिता ९८0 तर सरपंच पदाकरिता २७१ जणांनी अर्ज दाखल केले होते. प्रत्यक्षात जिल्हय़ातील ११ तालुक्यातील ४३ ग्रामपंचायतींची ही निवडणूक १४४ प्रभागात होत असून, ३९७ ग्रामपंचायत सदस्य आणि ४३ सरपंच या प्रक्रियेतून निवडले जाणार आहे. प्रत्यक्षात २६ डिसेंबर रोजी मतदान होणार असून, २७ डिसेंबरला मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे. यासाठी १५२ मतदान केंद्र राहणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.

प्रचारासाठी दहा दिवसप्रचारासाठी दहा दिवस निवडणूक रिंगणातील सदस्य व सरपंचांना मिळणार आहेत. नामांकन अर्ज दाखल केल्याच्या तारखेपासून त्यांचा निवडणूक खर्च  विचारात घेणार आहे. दरम्यान, सात ते नऊ सदस्य असलेल्या ग्रा.पं.मध्ये प्रचारासाठी उमेदवाराला २५ हजार रुपयांची खर्च र्मयादा राहणार आहे. ११ ते १३ सदस्य संख्या असलेल्या ग्रामपंचायतीमधील उमेदवारांसाठी ३५ हजार रुपये खर्च र्मयादा राहणार आहे.

शुक्रवारी होईल चित्र स्पष्टशुक्रवारी नामांकन अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्याच दिवशी दुपारी निवडणूक रिंगणातील उमेदवारांना चिन्ह वाटप होईल. त्यानंतर प्रत्यक्षात ४३ ग्रामपंचायतीमधील लढतींचे चित्र स्पष्ट होणार आहे. तुर्तास मात्र १३ आणि १४ डिसेंबरला कोण अर्ज मागे घेतो याकडे सध्या गावकीच्या  राजकारणाचे लक्ष लागून आहे.

सरपंचपदाच्या उमेदवारासाठीची खर्च र्मयादासरपंच पदासाठीच्या उमेदवारासाठी ही खर्च र्मयादा ७ ते ९ सदस्य संख्या असलेल्या ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात ५0 हजार रुपये, ११ ते १३ सदस्य संख्या असलेल्या ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात एक लाख रुपये आणि १५ ते १७ सदस्य संख्या असलेल्या ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात एक लाख ७५ हजार रुपये राहणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. गेल्या महिन्यातील निवडणूकीपासून ही र्मयादा वाढविण्यात आली आहे. उपरोक्त र्मयादेतच निवडणुकीचा खर्च संबंधित उमेदवारांना करावा लागणार आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक