शहरं
Join us  
Trending Stories
1
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
3
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
4
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
5
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
6
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
7
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
8
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
9
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
10
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
11
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
12
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
13
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
14
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
15
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
16
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
17
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
18
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
19
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
20
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार

Gram Panchayat Election : पॅनलला मतदान करताना उडणार गोंधळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 12:32 IST

Gram Panchayat Election: पॅनल बांधून दोन किंवा तीन जागांवर असलेल्या उमेदवारांना एकसमान चिन्ह मिळणार नाही.

ठळक मुद्देनिवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना मुक्त चिन्हांपैकी कोणतेही चिन्ह निवडता येणार आहे प्रचार करताना आता उमेदवार आणि पॅनल प्रमुखांच्या नाकी नऊ येणार आहेत. 

लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव : ग्रामपंचायतमध्ये प्रभागनिहाय निवडणूक लढताना त्या प्रभागात पॅनल बांधून दोन किंवा तीन जागांवर असलेल्या उमेदवारांना एकसमान चिन्ह मिळणार नाही. प्रत्येकाला स्वतंत्र चिन्ह देण्याची तरतूद आयोगाने केल्यामुळे प्रचार करताना आता उमेदवार आणि पॅनल प्रमुखांच्या नाकी नऊ येणार आहेत. निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना मुक्त चिन्हांपैकी कोणतेही चिन्ह निवडता येणार आहे.  ज्या उमेदवाराने प्रथम उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे, तेथून चिन्हवाटपाची प्रक्रिया सुरू होईल. त्यानंतरच्या क्रमाने उमेदवारांच्या पसंतीनुसार चिन्हवाटप केले जातील. उमेदवाराने मागितलेले चिन्ह आधी कोणत्याच उमेदवाराला दिले नसेल तर त्याला त्याच्या पसंतीचे चिन्ह मिळणार आहे. एखाद्याने दिलेल्या पसंतीक्रमातील एकही चिन्ह वाटपासाठी उपलब्ध नसेल तर त्या उमेदवाराकडून वाटपासाठी शिल्लक असलेल्या चिन्हांपैकी एका चिन्हाची पसंती लेखी स्वरूपात घेण्यात येईल.

४० नवीन चिन्हांची भर! नव्या चिन्हांमुळे ही संख्या आता १९० झाली आहे. नव्या चिन्हांमध्ये पेन ड्राइव्ह, इस्त्री, क्रेन, पाव, केक, फलंदाज या चिन्हांसह सफरचंद, फणस, नारळ, द्राक्षे, अक्रोड, कलिंगड, अननस आदी फळांचा समावेश आहे.  आले, हिरवी मिरची, ढोबळी मिरची, फ्लॉवर, भेंडी, मका, भुईमूग, वाटाणे आदी नवीन प्रचार चिन्हे आहेत. त्याचबरोबर डिश अँटेना, दरवाजाची घंटी, दरवाजाची मूठ, ड्रिल मशीन, डंबेल्स, कानातले दागिने (कर्णफुले), विजेचे खांब, लिफाफा, एक्स्टेंशन बोर्ड, बासुरी, फूटबॉल, काटा, कारंजे, फ्राय पॅन, नरसाळे, द्राक्षे, हिरवी मिरची, हातगाडी, हार्मोनियम, हॅट ही चिन्हे आहेत.

नोंदवहीच्या नोंदीनुसार ठरणार क्रमएकापेक्षा अधिक उमेदवारांनी एकाचवेळी उमेदवारी सादर केली असेल अशावेळी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याचा जो क्रमांक नोंदविलेला आहे, त्या क्रमानुसार उमेदवारांना चिन्हवाटप करण्यात येणार आहे. एखादा उमेदवार एकापेक्षा अधिक प्रभागात निवडणूक लढवीत असल्यास त्यांना सारखेच चिन्ह वाटपात प्राधान्य राहणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे. 

टॅग्स :khamgaonखामगावElectionनिवडणूकgram panchayatग्राम पंचायत