Gram Panchayat Election : प्रवर्गनिहाय राहणार डमी मतपत्रिकांचा रंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2021 12:16 PM2021-01-06T12:16:45+5:302021-01-06T12:20:37+5:30

Gram Panchayat Election: निवडणूक आयोगाने मतपत्रिकेसाठी प्रवर्गनिहाय रंग ठरवून दिला आहे.

Gram Panchayat Election: The color of dummy ballot papers will be category wise | Gram Panchayat Election : प्रवर्गनिहाय राहणार डमी मतपत्रिकांचा रंग

Gram Panchayat Election : प्रवर्गनिहाय राहणार डमी मतपत्रिकांचा रंग

googlenewsNext
ठळक मुद्देमतपत्रिकांचा रंग अनुसूचित जातीसाठी फिका गुलाबी राहणार आहे.खुल्या प्रवर्गासाठी मतपत्रिकांचा रंग पांढरा राहणार आहे.अनुसूचित जमातीसाठी फिका हिरवा राहणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क 
खामगाव :  ग्रामपंचायत निवडणुकीची रंगत दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच आता मतदारांसाठीच्या डमी मतपत्रिका छपाईसाठी उमेदवार कामाला लागले आहेत. 
निवडणूक आयोगाने मतपत्रिकेसाठी प्रवर्गनिहाय रंग ठरवून दिला असल्याने त्या रंगांची डमी मतपत्रिका तयार करण्याचाही प्रयत्न उमेदवारांकडून केला जात आहे.  मतपत्रिकांचा रंग अनुसूचित जातीसाठी फिका गुलाबी, अनुसूचित जमातीसाठी फिका हिरवा, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी फिका पिवळा व खुल्या प्रवर्गासाठी मतपत्रिकांचा रंग पांढरा राहणार आहे.
ग्रामपंचायतच्या निवडणुकीचा कार्यक्रम सुरू असून ४ जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून उमेदवारांना निवडणुकीचा खर्च तहसील कार्यालयाच्या निवडणूक विभागाकडे सादर करणे आवश्यक असल्याचे आयोगाने यापूवर्वीच  बंधनकारक केले आहे. ग्रामपंचायतच्या निवडणुकीला उभ्या असलेल्या उमेदवारांना खर्च मर्यादा २५ ते ५० हजार रुपयांपर्यंत आहे. ७ ते ९ सदस्यसंख्या असलेल्या उमेदवारांना २५ हजार, ११ ते १३ सदस्यसंख्या असलेल्या उमेदवारांना ३५ हजार, तर १५ ते १७ सदस्यसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीच्या उमेदवारांना ५० हजार रुपये खर्च मर्यादा आहे.  उमेदवारांना दैनंदिन खर्चसुद्धा एक दिवसाआड निवडणूक आयोगाकडे सादर करावा लागणार असल्याचे सुत्रांनी स्पष्ट केले आहे.

Web Title: Gram Panchayat Election: The color of dummy ballot papers will be category wise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.