शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
2
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
3
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
4
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
5
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
6
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
7
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
8
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
9
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
10
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
11
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
12
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
13
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
14
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
15
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
16
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
17
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
18
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
19
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
20
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!

हरभरा उत्पादकांना प्रतिक्विंटल हजार रुपयांचा फटका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 18:40 IST

- सोहम घाडगे बुलडाणा :  खरिपात झालेल्या नुकसानाची रब्बीतील हरभरा व तुरीच्या विक्रीतून भरपाईच्या आशेवर असलेल्या शेतकºयांच्या पदरी निराशा ...

- सोहम घाडगेबुलडाणा :  खरिपात झालेल्या नुकसानाची रब्बीतील हरभरा व तुरीच्या विक्रीतून भरपाईच्या आशेवर असलेल्या शेतकºयांच्या पदरी निराशा आली आहे. व्यापाºयांकडून हमीभावापेक्षा कमी दराने माल खरेदी केला जात आहे. दुसरीकडे बाजारपेठेत नवीन हरभरा, तूर दाखल होताच भाव घसरले आहेत. हमीभाव मिळत नसल्यामुळे हरभरा उत्पादकांना प्रतिक्ंिवटल एक हजार रुपयांचा फटका बसत आहे. एकीकडे रासायनिक खते, कीटकनाशकांचे भाव वाढत असताना शेतमालाला कवडीमोल दर मिळत असल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. दोन आठवड्यांपूर्वी हरभºयाला प्रतिक्विंटल ३ हजार ५०० ते ४ हजार ३०० रुपयांपर्यंत  दर मिळत होता. मात्र नवीन हरभरा दाखल होताच हरभºयाचे दर ३ हजार ते ३ हजार ७०० वर आले आहेत. त्यामुळे प्रतिक्विंटल ७०० ते ८०० रुपयांनी दर घसरले आहेत. शासनाचा हमीभाव ४४०० रुपये आहे. हमीभावापेक्षा १  हजार ४००  रुपयांनी कमी दराने हरभरा विक्री होत आहे. त्यामुळे शेतकºयांचे प्रतिक्विंटल १ हजार रुपयांनी नुकसान होत आहे. आधीच दुष्काळामुळे या भागात शेतमालाचे उत्पादन घटले असून एकरी चार ते पाच क्विंटल उत्पादन होत आहे. यंदा दुष्काळाने सर्वच शेतमालाचे उत्पादन अत्यल्प झाल्याने दर चांगले राहतील, अशी शेतकºयांना अशा होती. परंतू त्यांच्या आशेवर पाणी फेरले आहे. परिसरात हरभरा उत्पादक शेतकºयांची मोठी संख्या आहे. यंदा बहुतांश शेतकºयांना खरिपातून उत्पादन खर्चही हाती लागला नाही. त्यामुळे हरभºयावर शेतकºयांची मदार होती. शेतमालाचे दर स्थिर नसल्याने शेतकºयांना प्रचंड नुकसान सहन करावे लागत आहे.  हरभºयाबरोबरच तुरीचेही दर चांगलेच घसरले आहेत. तुरीला सुरुवातीला ५ हजार ३०० रुपये दर मिळत होता. मात्र सध्या तुरीला ४ हजार ते ४ हजार ९०० रुपयेपर्यंत भाव मिळत आहे. त्यामुळे प्रतिक्विंटल मागे दरात घसरण झाली आहे. तुरीला हमीभाव ५ हजार ६७५ रुपये आहे. हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी होत असल्याने शेतकºयांचे नुकसान होत आहे. 

 नाफेड बंद; शेतकरी त्रस्तबुलडाणा येथे नाफेडचे तूर खरेदी केंद्र अद्यापही सुरू झालेले नाही. त्यामुळे शेतकरी व्यापारांना तूर विकत आहेत. व्यापाºयांकडून कमी दर मिळत असल्याने त्यांचे नुकसान होत आहे. बुलडाण्याचे केंद्र अद्याप सुरू न झाल्यामुळे व्यापारी परिस्थितीचा गैर फायदा घेत आहेत. यामाध्यमातून  शेतकºयांची लूट होत केली जात आहे.  बुलडाणा येथे तूर, हरभरा खरेदी केंद्र त्वरित सुरू करण्याची मागणी शेतकºयांनी जिल्हा मार्केटींग अधिकाºयांकडे केली आहे. 

 असा आहे हमीभाव शासनाने जाहीर केलेल्या हमीभावापेक्षा कमी दराने माल खरेदी केला जात असल्याने शेतकºयांचे नुकसान होत आहे. त्यामुळे नाफेडमार्फत खरेदी केंद्र सुरु करण्याची गरज आहे. शासनाच्या हमीभावाप्रमाणे हरभरा ४ हजार ४००, तूर ५ हजार ६७५, सोयाबीन ३ हजार ३९९, ज्वारी २ हजार ३४०, मका १ हजार ७००, उडीद ५ हजार ६००, मूग ६ हजार ९७५ असा दर आहे. मात्र व्यापाºयांकडे एवढा भाव मिळत नाही. पैशांची गरज असल्याने शेतकºयांना कमी भावात माल विकल्याशिवाय पर्याय राहत नाही.  

टॅग्स :buldhanaबुलडाणाFarmerशेतकरीagricultureशेती