शहरं
Join us  
Trending Stories
1
जपानच्या अधिकाऱ्याचा फोन चीनच्या विमानतळावर चोरीला गेला; अणुऊर्जा प्रकल्पांसह अत्यंत गोपनीय माहिती लीक होण्याचा धोका...
2
डोनाल्ड ट्रम्प यांची तेल कंपन्यांसोबत बैठक, अमेरिका भारताला व्हेनेझुएलाचे तेल देण्यास तयार; पण एका अटीवर...
3
ठाकरेंनी एक तरी ठोस विकासकाम दाखवावे; मुख्यमंत्री फडणवीस यांचे युतीच्या प्रचारसभेत आव्हान
4
भयंकर प्रकार! 'द राजा साब'च्या स्क्रीनिंगदरम्यान प्रभासच्या चाहत्यांनी कागदाचे तुकडे जाळले, व्हिडीओ व्हायरल
5
बांगलादेशात नव्या युगाची नांदी! खालिदा जिया यांच्यानंतर आता सुपुत्र तारिक रहमान यांच्याकडे बीएनपीची धुरा
6
आजचे राशीभविष्य १० जानेवारी २०२६ : धनु राशीला पदोन्नतीचे योग, तर तूळ राशीने राहावे सतर्क; वाचा काय सांगते तुमचे नशीब!
7
आमच्या अस्तित्वासाठी नव्हे, राज्यातील भावी पिढीच्या भवितव्यासाठी एकत्र आलो: ठाकरे बंधू
8
वडापाव-दाल पकवानचे महागठबंधन सत्तेवर येणार: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मराठी-सिंधीवर भाष्य
9
विचारसरणी सोडून काँग्रेससोबत जाणाऱ्यांवर भाजपने कारवाई करावी: खासदार डॉ. श्रीकांत शिंदे
10
कुठे, कोणत्या मुद्द्यांवर निवडणूक? मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, पनवेलमध्ये काय गाजतेय?
11
अजित पवारांची मिळाली साथ; अंबरनाथमध्ये शिंदेसेनेने भाजपचे ‘सत्तास्वप्न’ लावले उधळून
12
अमेरिका : मोदींनी फोन न केल्याने करार रखडला; भारत : मोदी-ट्रम्प यांच्यात ८ वेळा फोनवर संवाद
13
यंदा अर्थसंकल्प रविवारी मांडणार? अधिवेशन सुरू होणार २८ जानेवारीपासून; १३ फेब्रुवारीला संपेल
14
ईडीविरोधात तृणमूल संतप्त, खासदारांची दिल्लीत निदर्शने; ८ खासदार पोलिसांच्या घेतले ताब्यात
15
आम्ही जाणार नाही! चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी उमेदवारांच्या प्रचाराकडे फिरवली पाठ
16
सत्ताधाऱ्यांचे ‘विकासा’चे तर विरोधकांचे ‘बदल हवा’; ठाण्यात ठाकरे बंधू, भाजप-शिंदेसेनेचे बॅनर
17
राज्यात आचारसंहिता भंगाच्या १८६ तक्रारी, ८ कोटी जप्त केले; ३८ गुन्हे नोंदविण्यात आले
18
तीन वर्षांत किती बांगलादेशींना पकडून मायदेशी परत पाठवले? काँग्रेसचा सवाल; भाजपचा दावा फसवा
19
कारमध्ये १६ लाखांची रोकड; आचारसंहिता पथकाची कारवाई, पैसे कोठून आले? नवी मुंबईत कारवाई
20
अमेरिकेविरोधात महायुद्धाची तयारी? दक्षिण आफ्रिकेत चीन-रशिया-इराणच्या खतरनाक युद्धनौका पोहचल्या
Daily Top 2Weekly Top 5

अकोला येथील गोदामातून धान्य उचल पुन्हा विस्कळीत!

By अनिल गवई | Updated: March 21, 2024 21:26 IST

बुलढाणा जिल्ह्याला प्राधान्याने धान्य वितरणाचे जिल्हाधिकाऱ्यांचे पत्र

खामगाव: भारतीय अन्नधान्य महामंडळाच्या अकोला येथील गोदामातून धान्य उचलीचा तिढा कायम असल्याने, बुलढाणा जिल्ह्यातील धान्य वितरण व वाहतूक प्रणाली पुर्णत: विस्कळीत झाली आहे. ही बाब निदर्शनास येताच जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी भारतीय अन्नधान्य महामंडळाला बुलढाणा जिल्ह्याला प्राधान्याने आणि त्वरीत धान्य पुरविण्याबाबतचे पत्र दिले आहे.

प्राप्त माहितीनुसार, भारतीय अन्न धान्य महामंडळाच्या अकोला येथील गोदामातून अकोला, वाशिम, बुलढाणा आणि अमरावती जिल्ह्यासाठी धान्याची उचल केली जात आहे. परिणामी, भारतीय अन्नधान्य महामंडळाच्या अकोला येथील गोदामातील व्यवस्थापन ढासळले आहे. त्याचा फटका बुलढाणा जिल्ह्यातील धान्य वितरण आणि वाहतूक प्रणालीला बसत आहे. जिल्ह्यातील १६ पैकी अनेक शासकीय गोदामातून वेळेवर धान्य पुरविले जात नाही. त्यामुळे स्वस्त धान्य दुकानातूनही धान्याचे वितरण रखडल्याचे दिसून येते. या सर्व प्रकारामुळे धान्य वितरणात पहिल्या तीन असलेला बुलढाणा जिल्हा आता शेवटच्या क्रमांकावर पोहचला आहे. अकोला येथून धान्य वेळेवर मिळत नसल्याने, गोदाम बदलवून देण्याची मागणी जोर धरत आहे. सणासुदीत धान्याचा तुटवडासुटीच्या दिवशी धान्य वितरीत करण्याची पुरवठा विभागाची मागणी भारतीय खाद्य महामंडळाने धुडकावली आहे. मागील तीन महिन्यांपासून नियमित व पूर्ण क्षमतेने धान्याची उचल मिळाली नाही. परिणामी, बुलढाणा जिल्ह्यात ऐन होळी आणि पाडवा सणाच्या तोंडावर धान्याचा तुटवडा निर्माण होत आहे. वाहने भरून मिळत नसल्याची तक्रारअकोला येथील गोदामात उपलब्ध असलेली सर्व वाहने अकोला येथील गोदामातून भरून मिळत नसल्याची तक्रार जिल्हा वाहतूक प्रतिनिधी यांनी जिल्हा पुरवठा अधिकाऱ््यांकडे केली आहे. वाहने भरून दिली जात नसल्याचा प्रकार अनेकवेळा घडल्याचे तक्रारीत नमूद आहे. पूर्ण क्षमतेने उचल नाही

मार्च महिन्यात सुट्टीच्या दिवशी व रॅक येण्याच्या दिवशी उचल न दिल्याने अवघे १० ते १२ दिवस धान्याची उचल मिळाली. परिणामी, बुलढाणा जिल्ह्याला पूर्ण क्षमतेने धान्य मिळाले नाही. ही बाब जिल्हाधिकारी डॉ. िकरण पाटील यांनी हेरली, हे येथे विशेष! बुलढाणा जिल्हाला प्राधान्याने आणि त्वरीत धान्य वितरीत करण्याच्या सूचना भारतीय अन्नधान्य महामंडळाला दिल्या आहेत. महिन्याच्या १० तारखेनंतर देखील धान्य वितरणास मंजूरी देण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर केला आहे.डॉ. किरण पाटीलजिल्हाधिकारी, बुलढाणा

टॅग्स :buldhanaबुलडाणा