शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

धान्य वाहतुकीचा पर्यायी व्यवस्थेवर भार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 15:16 IST

धान्य वाहतूकीचे कंत्राट निश्चित होईपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात पर्यायी वाहतूक व्यवस्थेवर जिल्ह्यातील धान्य वाहतूकीचा भार राहणार आहे.

- ब्रम्हानंद जाधव लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: पुरवठा विभागांतर्गत होणाऱ्या धान्य वाहतुकीचा जिल्ह्यातील कंत्राट संपत असल्याने तात्पुरत्या स्वरूपात पर्यायी वाहतूक व्यवस्था करण्याच्या हालचाली सध्या जिल्हा पुरवठा विभागामध्ये सुरू आहेत. जिल्ह्यातील धान्य वाहतुकीसाठी २६ वाहने लागतात. दरम्यान, धान्य वाहतूकीचे कंत्राट निश्चित होईपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात पर्यायी वाहतूक व्यवस्थेवर जिल्ह्यातील धान्य वाहतूकीचा भार राहणार आहे.गोरगरीबांना वेळेवर धान्य मिळावे, सार्वजनिक वितरण व्यवस्थेमध्ये अधिक पारदर्शकता यावी, अनुषंगाने घरपोच धान्य योजना, द्वारवितरण योजना यासारख्या विविध योजना पुरवठा विभागाकडून सुरू करण्यात आलेल्या आहेत. सार्वजनिक वितरण व्यवस्थेतंतर्गत निर्धारीत दराने व योग्य दर्जाचे धान्य शिधापत्रिकाधारकांना उपलब्ध होईल, याची हमी देण्याच्या उद्देशाने सुधारित धान्य वितरण पद्धत राबविण्यात येत आहे. भारतीय अन्न महामंडळ गोदाम ते रास्त भाव दुकानापर्यंत जिल्हावार एकाच वाहतूक दारामार्फत अन्नधान्याची वाहतूक करण्यात येते. यासाठी जिल्हावार वाहतूक कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आलेली आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत धान्य वाहतूकीसाठी जिल्ह्याला जवळपास २६ वाहने लागतात.सध्या सुरू असलेल्या वाहतूक दाराचा कंत्राट संपुष्टात येत आहे. त्यामुळे सुधारित वितरण पद्धतीनुसार अन्नधान्य व इतर जीवनावश्यक वस्तूंचे कंत्राट निश्चित होईपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात पर्यायी वाहतूक व्यवस्था करण्यात येत आहे. त्यासाठी जिल्हा पुरवठा विभागाकडून वाहतुकदारांना प्रस्ताव मागविण्यात आले होते. त्यानुसार ट्रान्सपोर्ट कंपन्यांचे दरपत्रकानुसार प्रस्ताव पुरवठा विभागाकडे आले असून, त्याची पडताळणी सध्या सुरू आहे.

सात ‘ट्रान्सपोर्ट’ कंपन्यांचा पुढाकारधान्य वाहतूक कंत्राट निश्चित होईयर्पंत तात्पुरत्या स्वरूपात पर्यायी वाहतूक व्यवस्था करण्यासाठी वाहतूक दारांकडून दरपत्रकासह प्रस्ताव मागविण्यात आले होते. वाहतूकदारांना सर्व कागदपत्रे व दरपत्रक पुरवठा कार्यालयाकडे सादर करण्यासाठी ५ जुलै ते ११ जुलैचा कालावधी देण्यात आला होता. या कालावधीत सात ट्रान्सपोर्ट कंपन्यांनी वाहतूकीसाठी प्रस्ताव पाठविले आहेत.

अशी राहणार वाहतूकसार्वजनिक वितरण व्यवस्थेतंर्गत जिल्ह्याचे सरसारी नियतन १२ हजार ४६० मे. टन आहे. पर्यायी वाहतूक व्यवस्थे अंतर्गत वाहतूकदारांना भारतीय खाद्य निगम खामगाव ते शासकीय गोदापर्यंत वाहतूक करावी लागणार आहे. त्यानंतर एमआयडीसी गोंदीया ते शासकीय धान्य व शासकीय धान्य गोदाम ते जिल्ह्यातील १ हजार ५३७ रास्त भाव दुकान अशी धान्याची वाहतूक चालणार आहे.धान्य वाहतूकीचा पुढील कंत्राट निश्चित होईपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात पर्यायी वाहतूक व्यवस्था करण्यात येत आहे. परंतू जोपर्यंत पर्यायी व्यवस्था होत नाही, तोपर्यंत पुर्वीचाच कंत्राटदार राहिल. पर्यायी वाहतूक व्यवस्थेसाठी सात प्रस्ताव आले आहेत. या सातपैकी ज्यांची कागदपत्रे बरोबर आहे, त्यांचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येईल.- गणेश बेलाळे, जिल्हा पुरवठा अधिकारी, बुलडाणा.

टॅग्स :buldhanaबुलडाणा