सिंदखेडराजा (जि. बुलडाणा) : भाजपा सरकार हे शेतकर्यांचे नव्हे तर उद्योगपतींचे सरकार आहे. या सरकारला शेतकर्यांप्रती कोणतीही आत्मीयता नाही. त्यांना शेतकर्यांच्या मागण्यांचा विसर पडत चालला असल्याचा आरोप आ. राहुल बोंद्रे यांनी केला. ते सिंदखेडराजा मतदारसंघात काँग्रेसच्यावतीने शेतकर्यांच्या विविध न्याय मागण्यांसाठी स्थानिक उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर २ फेब्रुवारी रोजी आयोजित मोर्चाप्रसंगी बोलत होते. कापसाला ७ हजार, सोयाबीनला ५ हजार रुपये, उसाला ३ हजार रुपये भाव देण्यात यावा, तसेच शेतकर्यांचे शंभर टक्के कर्ज माफ करून त्यांना हेक्टरी २५ हजार रुपयांची मदत देण्यात यावी, यासह विविध मागण्यांचे निवेदन काँग्रेस पक्षाच्यावतीने उपविभागीय अधिकारी विवेक घोडके यांना देण्यात आले.
शेतक-यांच्या मागण्यांचा सरकारला विसर
By admin | Updated: February 3, 2015 00:46 IST