संग्रामपूर (बुलडाणा) : तालुक्यातील हिवरखेड येथून सोनाळ्याकडे येत असलेल्या बोलेरो गाडीतून चार लाख रुपये जप्त केल्याची घटना आज सोगोडा फाट्यावर घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठय़ा प्रमाणात रक्कम हस्तगत करण्यात आल्याने परिसरात विविध चर्चांना पेव फुटले आहे. याबाबत प्राप्त माहितीनुसार, एका विना क्रमांकाच्या नव्या कोर्या बोलेरो गाडीची तपासणी केली असता, पोलिसांना या गाडीमध्ये चार लाख रूपयांची रक्कम आढळून आली. रक्कम सोनाळा येथील संत्रा उत्पादक शेतकर्यांना वाटप करण्यासाठी व्यापार्यांकडून आणल्याचे ताब्यात असलेल्या इसमांनी पोलिसांना सांगितले. ही कारवाई बुलडाणा पोलिस मुख्यालयाचे हे.कॉ.बळीराम माठे यांनी केली. याप्रकरणी उत्तमराव अलोडे रा.वरुड जि.अमरावती यांच्यासह चौघांना ताब्यात घेण्यात आले असून, पुढील चौकशी सुरु आहे. याप्रकरणी कुठली कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सोगोडा चेक पोस्टवर चार लाख रुपये हस्तगत
By admin | Updated: October 1, 2014 00:38 IST