शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षणासाठी १० हजार रक्तांच्या सह्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 16:08 IST

आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी रस्त्यावर रक्त सांडण्यापेक्षा आरक्षणाच्या मागणीच्या भावना शासनापर्यंत पोहचविण्यासाठी रक्तांच्या सह्यांची मोहीम राबविण्यात आली.

ठळक मुद्देरस्त्यावर रक्त सांडण्यापेक्षा भावना पोहचविण्यासाठी रक्ताच्या सह्यांची मोहीम- सावजी यासाठी मराठा, मुस्लीम, धनगर, लिंगायत, महादेव कोळी यांच्यासह विविध राजकीय पक्षाच्या पदाधिकाºयांनी परिश्रम घेतले.या उपक्रमाची दखल राज्यस्तरावर घेण्यात येईल, अशी अपेक्षा यावेळी सुबोध सावजी यांनी व्यक्त केली.

बुलडाणा : मराठा आरक्षणाला आमचा पाठींबा असून मराठा समाजासह मुस्लीम, धनगर, लिंगायत व महादेव काळी या समाजाला त्वरित आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी रस्त्यावर रक्त सांडण्यापेक्षा आरक्षणाच्या मागणीच्या भावना शासनापर्यंत पोहचविण्यासाठी रक्तांच्या सह्यांची मोहीम राबविण्यात आली. या रक्तांच्या सह्यांचे निवेदन ७ आॅगस्ट रोजी जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात येणार आहे.

या मोहीमेस सर्वधर्मातील व्यक्ती, राजकीय पक्षाच्या पधाधिकाºयांनी पाठींबा दिल्याची माहिती माजी राज्यमंत्री सुबोध सावजी स्थानिक विश्राम भवनात ७ आॅगस्ट रोजी आयोजित पत्रकार परिषदेत यांनी दिली. यावेळी महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस शाम उमाळकर, माजी आमदार दिलीपकुमार सानंदा, जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष रिजवान सौदागर, समिती संपर्क प्रमुख शैलेश सावजी आदींची उपस्थिती होती. सावजी पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात मराठा समाजासह मुस्लीम, धनगर, लिंगायत व महादेव काळी या समाजाला त्वरित आरक्षण मिळावे, अशी मागणी आहे. आरक्षण मिळण्यासाठी अनेक ठिकाणी मोर्चे, आंदोलने काढण्यात येत आहेत. काही ठिकाणी तोडफोडीच्या घटना घडत आहेत. मात्र हिंसाचाराने काहीही साध्य होत नाही. त्यामुळे रस्त्यावर रक्त सांडते. मात्र आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर रक्त न सांडता आरक्षण मागणीच्या तिव्र भावना शासनापर्यंत पोहचविण्यासाठी १० हजार रक्ताने लिहिलेल्या सह्याची मोहीम १ ते ७ आॅगस्ट रोजी राबविण्यात आली. या रक्तांच्या सह्यांचे निवेदन ७ आॅगस्ट रोजी जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात येणार आहे. यासाठी मराठा, मुस्लीम, धनगर, लिंगायत, महादेव कोळी यांच्यासह विविध राजकीय पक्षाच्या पदाधिकाºयांनी परिश्रम घेतले. त्यात काँग्रेसचे आमदार राहूल बोंद्रे, आमदार हर्षवर्धन सपकाळ, माजी आमदार दिलीपकुमार सानंदा, शाम उमाळकर, माजी जि.प.अध्यक्ष प्रकाश पाटील, रिजवान सौदागर, बुलडाणा जिल्हा शासकीय नळ पाणी पुरवठा भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे उपाध्यक्ष वा.रा.पिसे, शैलेश सावजी, अबरार मिल्ली, समितीचे सहसचिव सुनिता भांड, दामुअण्णा ढोणे, अविनाश अकोटकार, चंद्रकांत माने, जगन्नाथ भांड, संजय तारापुरे, खुशालराव गायकवाड आदींनी सहभाग घेत १० हजार रक्तांच्या सह्यांची मोहीम राबविली. या १० हजार रक्तांच्या सह्यांचे निवेदन जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात येणार असून या उपक्रमाची दखल राज्यस्तरावर घेण्यात येईल, अशी अपेक्षा यावेळी सुबोध सावजी यांनी व्यक्त केली.

टॅग्स :buldhanaबुलडाणाSubodh Savjiसुबोध सावजी