शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

त्रुटींमुळे वंचित राहिलेल्या बुलडाणा जिल्हय़ातील २८ हजार शेतकर्‍यांना सोयाबीनचे अनुदान द्या - राहुल बोंद्रे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 00:01 IST

जिल्हय़ातील सुमारे २८ हजार शेतकर्‍यांच्या अर्जांमध्ये त्रुटी आढळून आल्याने वंचित राहावे लागत आहे. ही बाब काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. राहुल बोंद्रे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत उपस्थित करून शेतकर्‍यांना त्रुटी पूर्ण करण्यासाठी संधी देण्याबरोबरच त्यांना अनुदान वितरित करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात यावा, अशी आग्रही मागणी पालकमंत्री ना. भाऊसाहेब फुंडकर यांच्याकडे केली आहे.

ठळक मुद्देराहुल बोंद्रे यांची पालकमंत्री ना. भाऊसाहेब फुंडकर यांच्याकडे मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : खरीप २0१६-१७ मध्ये सोयाबीनचे भाव घसरल्याने शासनाने सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांना प्रतिक्विंटल २00 रुपये जाहीर केलेल्या अनुदानापासून जिल्हय़ातील सुमारे २८ हजार शेतकर्‍यांच्या अर्जांमध्ये त्रुटी आढळून आल्याने वंचित राहावे लागत आहे. ही बाब काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. राहुल बोंद्रे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत उपस्थित करून शेतकर्‍यांना त्रुटी पूर्ण करण्यासाठी संधी देण्याबरोबरच त्यांना अनुदान वितरित करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात यावा, अशी आग्रही मागणी पालकमंत्री ना. भाऊसाहेब फुंडकर यांच्याकडे केली आहे.गत ऑक्टोबर ते डिसेंबर २0१६ या कालावधीत बाजार समितीमध्ये विक्री केलेल्या शेतकर्‍यांना प्रतिक्विंटल २00 रुपये व जास्तीत जास्त २५ क्विंटल प्रतिशेतकरी याप्रमाणे अनुदान शासनाने मंजूर केले होते.  यानुषंगाने जिल्ह्यात अर्ज केलेल्या ७८ हजार शेतकर्‍यांपैकी केवळ ५0 हजार ६८५ शेतकर्‍यांना अनुदान मंजूर करण्यात आले आहे. उर्वरित शेतकर्‍यांना त्रुटीअभावी अनुदान नामंजूर केल्या गेले. अर्ज केलेल्या शेतकर्‍यांच्या अर्जामध्ये असलेल्या त्रुटी पूर्ण करण्यासाठी त्यांना कुठलीही संधी न देता सरळ-सरळ त्यांचे अनुदान फेटाळण्याचा प्रकार प्रशासनाने केला असून, हा सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांवर अन्याय असल्याचे स्पष्ट करीत सदर शेतकर्‍यांना त्यांच्या अर्जातील त्रुटी पूर्ण करण्याची संधी देऊन त्यांना अनुदान वितरित करण्यात यावे, अशी मागणी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार राहुल बोंद्रे यांनी जिल्हा नियोजन समितीमध्ये पालमंत्री ना.भाऊसाहेब फुंडकर यांच्याकडे केली आहे. त्याचबरोबर शासनाने उर्वरित शेतकर्‍यांच्या त्रुटी पूर्ण करून घेऊन अनुदान न दिल्यास आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाRahul Bondreराहुल बोंद्रेBhausaheb Phundkarभाऊसाहेब फुंडकरFarmerशेतकरी