ओबीसींना राजकीय आरक्षण द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:42 IST2021-09-16T04:42:58+5:302021-09-16T04:42:58+5:30

महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारच्या वेळकाढू धोरणामुळे व सूडबुद्धीमुळे ओबीसी बांधवांवर अन्याय होत आहे म्हणून ओबीसी आरक्षण मिळेपर्यंत राज्यात कुठलीही ...

Give political reservation to OBCs | ओबीसींना राजकीय आरक्षण द्या

ओबीसींना राजकीय आरक्षण द्या

महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारच्या वेळकाढू धोरणामुळे व सूडबुद्धीमुळे ओबीसी बांधवांवर अन्याय होत आहे म्हणून ओबीसी आरक्षण मिळेपर्यंत राज्यात कुठलीही निवडणूक घेण्यात येऊ नये व त्वरित आरक्षण देण्यात यावे याकरिता लोणार भारतीय जनता पक्षाच्या वतीने मुख्यमंत्र्यांना तहसीलदारमार्फत निवेदन देण्यात आले. यावेळी भारतीय जनता पक्षाचे लोणार तालुका अध्यक्ष बाबाराव मुंडे, ज्येष्ठ नेते भगवानराव सानप, जिल्हा सदस्य विजय मापारी, बाबाराव गिते, शिवाजी सानप, गणेश डोळे, किसान मोर्चाचे मारोतराव सुरोशे, लोणार शहराध्यक्ष गजानन मापारी, पंढरी सांगळे, उद्धव आटोळे, विष्णू डोळे, संजय डोळे, विनोद थोरवे, गजानन चव्हाण, गणेश तांगडे, प्रकाश नागरे, ज्ञानेश्वर डोळे, सुरेश अंभोरे, दिलीप राठोड, बबन जाधव, पंढरी मापारी, राजू बारहाते यांच्यासह सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Give political reservation to OBCs