शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बाजार व हमीभावातील फरकाची रक्कम द्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2017 01:17 IST

चिखली : सरकारने उडीद व सोयाबीनची खरेदी करण्याऐवजी बाजारभाव व हमीभाव यातील फरक थेट उत्पादक शेतकर्‍यांना द्यावा, अशी मागणी चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉ.सत्येंद्र भुसारी यांनी एका निवेदनाद्वारे मुख्यमंत्री व कृषी मंत्र्यांकडे केली आहे.

ठळक मुद्देबाजार समिती सभापती भुसारी यांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : सरकारने उडीद व सोयाबीनची खरेदी करण्याऐवजी बाजारभाव व हमीभाव यातील फरक थेट उत्पादक शेतकर्‍यांना द्यावा, अशी मागणी चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉ.सत्येंद्र भुसारी यांनी एका निवेदनाद्वारे मुख्यमंत्री व कृषी मंत्र्यांकडे केली आहे.सरकारने जाहीर केलेल्या हमीभावाने उडीद, मूग, सोयाबीन या शेतमालाची नाफेडमार्फत खरेदी करण्यात येते. या खरेदी केंद्रावर माल विक्रीसाठी येणार्‍या अनंत अडचणींमुळे शेतकर्‍यांची प्रचंड फरफट होते. त्यात विक्रीनंतर मालाचे चुकारेही लवकर मिळत नसल्याने अनेक शेतकरी नाइलाजाने आपला शेतमाल बाजारात विक्री करतो. त्यामुळे त्यास मोठा तोटा सहन करावा लागतो. यावर उपाय करण्यासाठी कायदे कमी पडतात, शिवाय सद्यस्थितीत बाजारभावावर नियंत्रण ठेवणे आयात धोरणामुळे हाताबाहेर गेले आहे. म्हणून शेतकर्‍यांना हेक्टरी पीक र्मयादा ठरवून देऊन उडिदासाठी बाजारभाव ४ हजार व हमीभाव ५ हजार ४00 असा असेल तर त्यातील फरकाची रक्कम १४00 रुपये यानुसार प्रत्येक शेतमाल खरेदी न करता या खरेदीतील भावफरक शेतकर्‍यांच्या खात्यात जमा केल्यास शेतकर्‍यांची हेळसांड थांबून भ्रष्टाचारालाही आळा बसण्यास मदत होईल व शासनाचेही नुकसान टळणार असल्याने शेतमालाची खरेदी न करता शेतकर्‍यांना भाव फरकाची रक्कम देण्यात यावी, अशी मागणी डॉ.सत्येंद्र भुसारी यांनी मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस व कृष मंत्री ना.भाऊसाहेब फुंडकर यांच्याकडे केली आहे. 

खरेदीची संथ गतीचिखली तालुक्यातील ५ हजार श्ेातकर्‍यांनी सध्या शेतमालाच्या विक्रीसाठी नोंदणी केली आहे. गेल्या २0 दिवसांत यापैकी केवळ ३५0 शेतकर्‍यांच्या मालाचीच प्रत्यक्षात मोजणी झालेली आहे. खरेदीची हीच स्थिती राहिल्यास उर्वरित शेतकर्‍यांच्या मालाची मोजणी होण्यास किमान सहा महिने लागणार आहे. इतके दिवस सामान्य शेतकरी दम धरू शकत नाही, या बाबीचाही विचार व्हावा, अशी मागणी डॉ.भुसारी यांनी या निवेदनात केली आहे.

टॅग्स :market yardमार्केट यार्ड