शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

सातपुड्यात यशस्वी होतोय अद्रक शेतीचा प्रयोग!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 13:20 IST

खामगाव: बुलडाणा जिल्ह्यात घाटाखाली जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यात सातपुड्याच्या पायथ्याशी अद्रक शेतीचा प्रयोग यशस्वी होताना दिसतोय. सध्या भावात तेजी असल्याने यावर्षी अद्रक उत्पादक शेतकऱ्यांना चांगले दिवस आल्याचे दिसून येत आहे.

- देवेंद्र ठाकरेलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: बुलडाणा जिल्ह्यात घाटाखाली जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यात सातपुड्याच्या पायथ्याशी अद्रक शेतीचा प्रयोग यशस्वी होताना दिसतोय. सध्या भावात तेजी असल्याने यावर्षी अद्रक उत्पादक शेतकऱ्यांना चांगले दिवस आल्याचे दिसून येत आहे.बुलडाणा जिल्ह्यात तसे अद्रक उत्पादन घेणाऱ्यांची संख्या फार नाही. सामान्य शेतकºयांना न झेपावणारा उत्पादन खर्च, पाण्याची कमरता व अद्रकासाठी उपयुक्त जमिन अशी अनेक कारणे त्यामागे आहेत. परंतु तरीही काही शेतकरी त्यांच्या शेतात नवनविन प्रयोग करून उत्पन्न वाढविण्याचे प्रयत्न करतात. बुलडाणा जिल्ह्यात दरवर्षी साधारणपणे १०० एकरावर अद्रक लागवड केली जाते. घाटावर देऊळगावराजा व घाटाखाली जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यात हे प्रमाण जास्त आहे. अद्रक हे जास्त कालावधीचे पिक असल्याने व उत्पादन खर्च अधिक असल्याने याकडे शेतकºयांचा कल कमी असल्याचे दिसून येते. परंतु ज्या शेतकऱ्यांनी अद्रक शेतीत सातत्य टिकवून ठेवले त्यांच्यासाठी सध्याचा काळ म्हणजे ‘सोन्याचे दिवस’ असेच चित्र आहे. सध्या ठोक बाजारात अद्रकाचे भाव ५० ते ६० हजार रूपये क्विंटलवर येऊन पोहचेले आहेत. त्यामुळे अद्रक उत्पादनातून शेतकºयांची घडी सावरताना दिसतेय. सध्या अद्रक शेतीतून एकरी १२५ ते १५० क्विंटल उत्पादन होत आहे. सध्याचे भाव पाहता एकरी ७  ते ८ लाख रूपयांचे अद्रक शेतकरी घेत आहेत. उत्पादन खर्च एकरी १ ते दीड लाख रूपयांच्या घरात आहे. त्यामुळे सध्या शेतकºयांना साधारपणपणे ५ ते ७ लाख रूपये निव्वळ नफा उरत असल्याचे दिसून येते. अद्रक विक्री करण्याकरीता बुलडाणा तसेच अकोला येथेही मोठी बाजारपेठ नसल्याने शेतकरी जळगाव खान्देश येथे अद्रकाची विक्री करतात.

मालाची आवक घटल्याने वाढले भाव!महाराष्ट्रात केरळमधूनही अद्रक मोठ्या प्रमाणावर येते. परंतु सरत्या वर्षात केरळमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे अद्रक शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. विदर्भात पावसाळाच झाला नसल्याने येथीलही उत्पादन घटले. परिणामी मागील वर्षी २ ते ३ हजार रूपये प्रतिक्विंटल असलेले  भाव वाढत जावून सध्या ५० ते ६० हजार रूपयांवर जावून पोहचले आहेत. किरकोळ बाजारात तर २०० रूपये किलोने ग्राहकांना अद्रक खरेदी करावे लागत आहे.

पिकासाठी लागतो सर्वाधिक कालावधी!अद्रक शेती न करण्यामागचे एक महत्वाचे कारण म्हणजे या पिकासाठी १० ते ११ महिन्यांचा कालावधी लागतो. म्हणजे साधारणपणे एक वर्षच यात निघून जाते. शेवटी योग्य भाव मिळाला नाही, तर केवळ उत्पादनखर्चच निघतो. परंतु अशाही परिस्थीतीत सातत्य टिकवून ठेवणाºया शेतकºयांसाठी २०१९ हे वर्ष आशेचा किरण घेवून आले आहे.

 

गेल्या चार ते पाच वर्षांपासून अद्रक शेती करीत आहे. दरवर्षीच चांगले भाव राहतात, असे नाही. परंतु यावर्षी मात्र भावात तेजी असल्यामुळे  अद्रक उत्पादनात सातत्य ठेवल्याचे समाधान वाटते.देविदास वानखडे, अद्रक उत्पादक शेतकरीलहूगाव (भगतपुरा) ता.संग्रामपूर

 

अद्रक उत्पादनासाठी भेगा न पडणारी व गाळाची जमिन आवश्यक आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी अशी जमिन आहे. परंतु  अद्रक उत्पादन घेणाºया शेतकºयांची संख्या मोठी नाही. यावर्षी भावात तेजी असल्याने नवनविन प्रयोग करू पाहणाºया शेतकºयांसमोर आशेचा किरण निर्माण झाला आहे.डॉ.अनिल गाभणेशास्त्रज्ञ,  कृषी विज्ञान केंद्र, जळगाव जामोद

टॅग्स :khamgaonखामगावSangrampurसंग्रामपूरagricultureशेतीFarmerशेतकरी