शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंनी चूक कबूल केली, म्हणाले...
2
“ठाकरे स्वार्थी नाही, प्रामाणिक-निर्भीड; ठाकरे ब्रँड पुसू इच्छिणारे पुसले गेले”: उद्धव ठाकरे
3
म्युच्युअल फंड KYC आता तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस कार्यालयातून करता येणार, कर्मचारी करणार तुमची मदत
4
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
5
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
6
China Rare Earth Quotas: चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
7
...तिथे 'मी'पणा आला म्हणून पराभव झाला; उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर भाजपाचा खोचक टोला
8
जीवघेणा कॅन्सर कायमचा संपणार! शास्त्रज्ञांनी क्रांतीकारी mRNA लस केली विकसित
9
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
10
"मराठी माणूस हिंदी सिनेमात हिरो होऊच शकत नाही, कारण...", अशोक सराफ स्पष्टच बोलले
11
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...
12
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
13
गौरी योगात कामिका एकादशी: ८ राशींवर धनलक्ष्मी कृपा, पदोन्नती-पगारवाढ; सुबत्ता-कल्याण काळ!
14
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
15
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
16
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
17
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
18
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
19
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
20
गांजा घरातच ‘पिकविण्या’चा नवा उद्योग; चार वर्षांपूर्वी पोलिसांना कल्पनाही नव्हती...

साडेचार हजार कर्मचा-यांचे भवितव्य अंधारात

By admin | Updated: April 18, 2015 02:04 IST

शासनाचे दुर्लक्ष; कार्यरत सदस्यांना कामावरून कमी करण्याची भीती.

नाना हिवराळे/ खामगाव : एकात्मिक पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत राज्यात सन २00९-१0 पासून ४ हजार ५00 पेक्षा जास्त कर्मचारी कार्यरत आहे. या कर्मचार्‍यांना दरवर्षी केवळ ११ महिन्याची मुदतवाढ दिली जाते; मात्र यावर्षी केवळ ३ महिन्याची मुदतवाढ दिली. कार्यरत सदस्यांना कामावरून कमी करण्याची भीती असल्याने या कर्मचार्‍यांचे भवितव्य अंधारात सापडले आहे. केंद्र पुरस्कृत एकात्मिक पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन कार्यक्रम हा राज्याच्या मृद व जलसंधारण विभाग आणि ग्रामीण विकास विभागाच्या माध्यमातून सन २00९- १0 पासून महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून राज्यात सुरू आहे. या कार्यक्रमांतर्गत विभागस्तर, जिल्हास्तर तसेच प्रकल्प स्तरावरील कामकाजासाठी कंत्राटी पद्धतीने मनुष्यबळ उपलब्ध करून राज्यातील सन २00९-१0 ते २0१४-१५ पर्यंत ३४ जिल्हय़ात ११७0 प्रकल्प कार्यरत आहेत. प्रकल्प चालविण्यासाठी पाणलोट विकास पथक सदस्य म्हणून ४ हजार ५00 पेक्षा जास्त सदस्यांना मानधन तत्त्वावर घेण्यात आले आहे. समूह संघटक, कृषी तज्ज्ञ व उपजीविका तरी म्हणून उच्चशिक्षित कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जलयुक्त सेवा, आदर्श गाव तसेच पाणलोट व्यवस्थापन या तिन्ही ठिकाणी पाणलोट विकास पथक सदस्य कार्यरत आहेत. या सदस्यामार्फत दरम्यानच्या काळात लोकसहभाग वाढविणे, गटांची स्थापना करणे, गटांच्या उत्पन्नामध्ये वाढ करून घेणे, नैसर्गिक साधन सं पत्तीचा विकास तसेच उपजीविका विकास आरखडे तयार करून राबविण्यास मदत झाली आहे. २00९-१0 पासून अविरतपणे मानधन तत्त्वावर सेवा देत असताना या कर्मचार्‍यांना मात्र त्यांच्या नोकरीची शाश्‍वती नाही.